Coronavirus Update: जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी च्या पार; अमेरिका, भारतासह सर्वाधिक फटका बसलेल्या Top 5 देशांची यादी पहा
Coronavirus | Archived, edited, symbolic images

Coronavirus Update Worldwide: जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्ण संख्येने रविवारी 1 कोटी म्हणजेच 10 मिलियनचा टप्पा पार केला आहे. Worldometer च्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जगभरात कोरोनाचे 1 कोटी 82 हजार 613 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 497,000 रुग्णांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. तर 54 लाख 58 हजार 523 रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका हा अमेरिकीला बसला असून सद्य घडीला या देशात कोरोनाचे 25,00,419 रुग्ण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील (Brazil) ,तिसर्‍यावर भारत  (India) चौथा रशिया (Russia) आणि पाचव्या क्रमांकावर युके (UK) असा कोरोना बाधित  टॉप 5  देशांच्या यादीत सध्याचा क्रम आहे.  या देशातील कोरोना रुग्णांची संख्या,मृत्यु आणि बरे झालेल्यांची संख्या पाहण्यासाठी खालील तक्ता तपासून पहा. भारतातील कोरोनाचे लेटेस्ट अपडेट्स जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

रॉयटर्सच्या माहितीनुसार, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि युरोपमध्ये प्रत्येकी २५% प्रकरणे आढळतात, तर आशिया आणि मध्य पूर्वेत अनुक्रमे 11% आणि 9% प्रकरणे आढळली आहेत.

कोरोनाबाधित Top 5 देश

देश  कोरोना रुग्णांची संख्या मृत्यु बरे झालेल्यांची संख्या
अमेरिका 25, 96,537 1,28,152 10,81,437
ब्राझील 13, 15,941 57,103 7,15,905
रशिया 6, 27,646 8,969 3,93,352
भारत 5,29,577 16,103 3, 10,146
युके 3,10,250 43,514 -

जगातील काही भागात कोरोना मुळापासून संपून सुद्धा पुन्हा वाढू लागला आहे. उदाहरणार्थ सर्वात आधी कोरोनाचा प्रसार जिथून सुरु झाला त्या चीन मधील वुहान शहरात तसेच न्यूझीलँड देशात एकदा कोरोना पूर्णतः संपल्यावर सुद्धा आता हळूहळू पुन्हा नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.