संपूर्ण जग कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या आजाराशी झुंज देत आहे. या विषाणूमुळे आत्तापर्यंत कोट्यवधी लोक मरण पावले आहेत, तर लाखो लोक संक्रमित झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कंपन्या कोरोना विषाणूविरुद्धची लस (Coronavirus Vaccines) तयार करीत आहेत. आता काही देशांनी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिल्यानंतर बर्याच देशांमध्ये, व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसीचे साईड इफेक्ट्सही दिसून आले आहेत. नॉर्वेमध्ये फायझरची (Pfizer) कोरोना विषाणूची लस लावल्यानंतर मरण पावलेली लोकांची संख्या 23 वर पोहोचली आहे, त्यामध्ये कोरोना लसीच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झालेल्या 13 लोकांचा समावेश आहे व इतरांची तपासणी चालू आहे.
अशाप्रकारे अनेक लोकांच्या मृत्यूंनंतर नॉर्वेने तत्काळ प्रभावाने लस देण्याच्या मार्गदर्शक सूचना बदलल्या आहेत. त्याच वेळी, बेल्जियममध्येही फायझरची कोरोना लस दिल्यानंतर 5 दिवसांनी एकाचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत, लसची सत्यता आणि प्रभावीपणाबद्दल गंभीर प्रश्न उद्भवले आहेत. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये बहुतेक वृद्ध आहेत व त्यांचे वाय 80 च्या पुढे असून हे लोक नर्सिंग होममध्ये दाखल होते. नॉर्वेमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत देशभरात 33 हजार लोकांना लस देण्यात आली आहे. Pfizer-BioNTech द्वारे तयार केलेली लस नॉर्वेमध्ये दिली जात आहे. (हेही वाचा: Coronavirus Vaccine Dose: कोरोना लसीचा दुसरा डोस घेणं का आवश्यक आहे का? जाणून घ्या तज्ञाचं मत)
जगातील आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की ते नॉर्वेमध्ये होणाऱ्या मृत्यूंवर बारीक लक्ष ठेवून आहेत. नॉर्वेसोबतच अनेक देशांमध्ये फायजरची लस दिल्यानंतर लोकांच्या मृत्यूची प्रकरणे समोर आली आहेत. या लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुष्परिणाम दिसून आले व पुढे त्यांचे गंभीर आजारांमध्ये रुपांतर होऊन लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, एका चिनी इम्युनोलॉजिस्टने म्हटले आहे की कोरोना लस घाईघाईने बनविण्यात आली आहे आणि संसर्ग रोखण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला नाही, ज्यामुळे आता त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.