Chandrayaan 4 : चांद्रयान 3 च्या यशानंतर आंतरराष्ट्रीय स्पेस एजन्सींचा इस्रोमध्ये वाढला रस; इस्त्रो लँडर आणि जपान रोव्हर बनवणार
Photo Credit: Wikimedia Commons

Chandrayaan 4 : चांद्रयान-3 (Chandrayaan 3) मोहिमेच्या यशानंतर आता भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रयान-4 (Chandrayaan 4) मोहिमेकडे लागले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Moon South pole) पोहोचणारा (India) पहिला देश ठरत भारताने इतिहास रचला आहे. यामुळे भारताच्या अंतराळ मोहिमांकडे (ISRO Space Mission) सर्वच देश एका वेगळ्या नजरेणे पाहत आहे. त्यातच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. ज्यात चांद्रयान 4 मोहिम ही भारत आणि जपानची संयुक्त अंतराळ मोहिम असणार असल्याचं समोर आलं आहे. चांद्रयान 4 ही भारताची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिम आहे. या मोहिमेमध्ये चंद्राचे नमुने पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. (हेही वाचा :Chandrayaan-4 Mission: इस्रो पुन्हा इतिहास रचणार, 2028 मध्ये चंद्रावरून माती आणण्यासाठी चांद्रयान-4 प्रक्षेपित केले जाणार )

इस्रो (ISRO) ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी  या दोन्ही संस्था मिळून या मोहिमेची तयारी करत आहेत. चांद्रयान 3 च्या यशामुळे आता या मोहिमेकडून अपेक्षा वाढल्या आहेत. चांद्रयान-4 मोहिमेचं नाव लुपेक्स मोहिम असही नाव ठेवण्यात आलं आहे. या मोहिमेद्वारे चंद्रावरील पाण्याचे साठे शोधचा येणार आहेत. त्याशिवाय, चंद्रावरील नमुने गोळा करुन पृथ्वीवर आणण्याचाही प्रयत्न असेल. चांद्रयान-4 मधील लँडर मॉड्युल ISRO बनवेल आणि जपानची स्पेस एजन्सी JAXA रोव्हर मॉड्यूल बनवणार आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ समनीत ठाकूर यांनी NIT हमीरपूरच्या वार्षिक टेक फेस्ट निंबस इव्हेंटमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. दोन आंतरराष्ट्रीय एजन्सी एकत्र काम करत असताना खूप काही शिकायला मिळते. अवकाश विज्ञानाचा वापर सामान्य माणसाच्या जीवनात खूप फायदेशीर. इस्रोच्या ग्रह मोहिमांमध्ये आव्हाने आणि यश दोन्ही आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

चांद्रयान-2 मध्ये इस्रोला अपयश मिळालं होतं. चांद्रयान-2 मधील लँडर विक्रमशी संपर्क तुटल्याने मोहीम अपयशी ठरली होती. यानंतर इस्रोनं चांद्रयान 2 च्या अपयशाचं रूपांतर चांद्रयान 3 च्या यशात केलं. चांद्रयान 3 च्या यशानंतर आता आंतरराष्ट्रीय स्पेस एजन्सींनीही इस्रोमध्ये रस दाखवायला सुरुवात केली आहे.