Photo Credit- X

Brahmaputra River Dam: चीनने शुक्रवारी तिबेटमधील (Tibet) ब्रह्मपुत्रा नदीवर (Brahmaputra River) जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याच्या आपल्या योजनेबाबत एक विधान केले आहे. या प्रकल्पाचा इतर देशांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही आणि अनेक दशकांच्या अभ्यासातून सुरक्षेचे प्रश्न सोडवले गेले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अंदाजे 137 अब्ज डॉलर्सच्या खर्चाच्या मोठ्या प्रकल्पाबाबतचे अनेक नकारात्मक प्रश्न फेटाळून लावले.

दरम्यान, हा प्रकल्प पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत नाजूक हिमालयीन प्रदेशात बांधला जात आहे. टेक्टोनिक प्लेटवर हा बांध बांधला जाणार असल्याने धोकादायक आहे. त्याशिवाय त्या भागात भूकंप वारंवार होतात असाही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. (Pakistan Attack on Afghanistan: अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्यात मृतांचा आकडा 46 वर; मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश)

अभ्यास करून धरण बांधले जात आहे

चीनने अनेक दशकांपासून व्यापक अभ्यास केला असल्याचे स्पष्टीकरणात म्हटले आहे. धरणा बांधताना सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. सीमा ओलांडून जाणाऱ्या नद्यांच्या विकासासाठी चीन नेहमीच जबाबदार आहे, तिबेटमधील जलविद्युत विकासाचा अनेक दशकांपासून सखोल अभ्यास केला गेला आहे आणि प्रकल्पाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा उपाय योजले गेले आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.

भारत, बांगलादेशच्या संपर्कात राहू

या प्रकल्पाचा डाउनस्ट्रीम भागांवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडणार नाही असे चीनने म्हटले आहे. चीन विद्यमान वाहिन्यांद्वारे डाउनस्ट्रीम देशांशी संपर्क कायम ठेवेल आणि आपत्ती निवारणासाठी सहकार्य वाढवेल, असेही सांगण्यात आले आहे.

धरण बांधण्यासाठी किती खर्च येईल

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की हा जलविद्युत प्रकल्प 'यारलुंग झांगबो' नदीच्या खालच्या भागात बांधला जाईल. 'यार्लुंग झांगबो' हे ब्रह्मपुत्रेचे तिबेटी नाव आहे. हे धरण हिमालयातील एका विशाल खोऱ्यात बांधले जाईल. जिथे ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते आणि नंतर बांगलादेशात मोठे वळण घेते. हाँगकाँगस्थित 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या मते, धरणातील एकूण गुंतवणूक एक ट्रिलियन युआन 137 अब्ज पेक्षा जास्त असू शकते.