Missing American Mountaineer's Body Found In Peru: अमेरिकेतील (American) पेरू (Peru) येथील एक गिर्यारोहक (Mountaineer) 22 वर्षांपूर्वी बर्फाळ शिखरावर चढत असताना बेपत्ता झाला होता. त्यानंतर वातावरणातील बदलामुळे बर्फ वितळल्याने त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. या व्यक्तीचे वय 59 वर्षे असून त्याचे नाव विल्यम स्टॅम्पफ्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. जून 2002 मध्ये विल्यम स्टॅम्पफ्ल बेपत्ता झाल्याची नोंद झाली.
विल्यम स्टॅम्पफ्ल हे जून 2002 मध्ये वयाच्या 59 व्या वर्षी बेपत्ता झाले होते. 6,700 मीटर (22,000 फूट) पेक्षा जास्त उंच Huascaran पर्वतावर हिमस्खलनामुळे ते गाडले गेले होते. बचाव पथकाने त्यांना शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, त्यांचा मृचदेह सापडला नाही. (हेही वाचा -Indian Student Dies in New York: न्यूयॉर्कमधील धबधब्यात पाय घसरून पडल्याने भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू)
पेरुव्हियन पोलिसांनी या घटनेचा तपास केला आणि घटनेची माहिती देताना सांगितले की, अँडीजच्या कॉर्डिलेरा ब्लँका पर्वतरांगावर बर्फ वितळल्यानंतर विल्यम स्टॅम्पफ्ल यांचा मृतदेह सापडला आहे. 22 वर्षांनंतर त्या व्यक्तीचा मृतदेह तेथे सापडला. याठिकाणी टेम्पफ्लचा मृतदेह तसेच त्याचे कपडे आणि शूज सापडले, असे पेरुव्हियन पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान विल्यम स्टॅम्पफ्ल यांचा पासपोर्टही सापडला. ज्यामुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्यात मदत झाली. (हेही वाचा - Kami Rita-Everest Record: गिर्यारोहक कामी रीताने मोडला विश्वविक्रम, 29 वेळी एव्हरेस्ट शिखर पार)
पेरूच्या पर्वतांचे वैशिष्ट्य काय आहे?
ईशान्य पेरूच्या पर्वतांची खासियत अशी आहे की, येथे हुआस्करन आणि कैशान सारखी बर्फाच्छादित शिखरे आहेत. जगभरातील गिर्यारोहकांना ते आवडतात. लोक अनेकदा येथे चढण्यासाठी येतात. मे महिन्यात आणखी एका प्रकरणात, एका इस्रायली प्रवाशाचा मृतदेह त्याच्या बेपत्ता झाल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर तेथे सापडला होता.