
America: कोरोना व्हायरसचे महासंकट संपूर्ण जगात अद्याप कायम आहे. कोरोनामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तिला त्याची लागण होत आहे. अशातच आता लहान मुले सुद्धा कोरोनाबाधित होत आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी लवकरच लसीचा डोस येऊ शकतो. अमेरिकेतील खाद्य आणि औषध प्रशासन यांनी 12-15 वयोगटातील मुलांना फायझरची लस देण्यास परवानगी मिळू शकते. द न्यूयॉर्क टाइम्स यांनी असे म्हटले की, एफडीए कडून या लसीला परवानगी मुलांच्या सुरक्षिततेसाठी असेल तर पालकांकडून त्यासाठी आनंद व्यक्त केला जाऊ शकतो.(Coronavirus In India: भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरिएंटवर WHO द्वारा अद्याप कोणताच निर्णय नाही)
युरोपियन युनियन यांनी औषध नियंत्रक ईएमए यांनी लहान मुलांसाठी फायझर-बायोएनटेक द्वारे विकसित करण्यात आलेली डोसचे आकलन करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत सुद्धा अशाच पद्धतीचे ट्रायल झाले आहे. यापूर्वी मार्च महिन्यात कंपन्यांच्या नेतृत्वात परीक्षणाच्या निष्कर्शावरुन समोर आले की, फायझर- बायोएनटेक कोरोना लस ही वृद्धांच्या तुलनेत अल्पवयीन आणि तरुणांसाठी अधिक प्रभावी आहे.(Coronavirus: कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी भारतामध्ये लॉकडाऊन लागू करणे गरजेचे; अमेरिकेचे Epidemiologist Anthony Fauci यांचे मत)
जर्मनीची औषध कंपनी बायोएनटेक यांचे असे म्हणणे आहे की, ते युरोपात 12-15 वयोगटातील मुलांसाठी जूनमध्ये लस लॉन्च करणार आहे. कंपनीच्या लसीचे ईयूने आकलन सुरु केले आहे. फायझर आणि त्यांची सहयोगी कंपनी जर्मन कंपनी बायोएनटेक सुद्धा या वर्षाच्या मार्चच्या अखेरीस असा दावा केला की, त्यांची लस पूर्णपणे सुरक्षित आहे.