Stampede in Uganda Shopping Mall: युगांडातील (Uganda) एका शॉपिंग मॉल (Shopping Mall) मध्ये रविवारी अचानक चेंगराचेंगरी (Stampede) झाली. या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. कंपालातील फ्रीडम सिटी मॉलमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी (New Year Celebration) लोक जमले होते. यावेळी चेंगराचेंगरीची घटना घडली. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, मध्यरात्री लोक फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी बाहेर पडले, त्यावेळी हा प्रकार घडला. ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले.
कंपालाच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि जखमींना रुग्णालयात नेले. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत." मिळालेल्या माहितीनुसार, नामसुबा उपनगरातील फ्रीडम सिटी मॉलमध्ये फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी लोक धावत असताना चेंगराचेंगरी झाली. (हेही वाचा -New Year Eve Sydney Harbour Bridge: नव्या वर्षाचं स्वागत करण्यास सिडनी सज्ज, २०२२ नववर्षाच्या पूर्वसंध्येला पहा ऑस्ट्रेलियातील सिडनी ब्रिजचा खास नजारा; Watch Video)
कंपाला मेट्रोपॉलिटनचे उप पोलीस प्रवक्ते ल्यूक ओवोयसिगिएरे यांनी सांगितले की, ही घटना मध्यरात्री घडली. जेव्हा मॉलमध्ये उपस्थित लोक बाहेर जाऊन फटाक्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी गेले. या घटनेत पाच जण जागीच मरण पावले आणि इतर चार जण जखमी अवस्थेत रूग्णालयात मरण पावले. इतर जखमींबाबत माहिती मिळू शकली नाही.
. @Lukowoyesigyire "The Katwe Territorial Police are investigating an incident of rash and neglect that occurred at a New Year's Eve event at the Freedom City Mall Namasuba and resulted in the deaths of nine people, including several juveniles"
1/3
— Uganda Police Force (@PoliceUg) January 1, 2023
पोलिसांनी सांगितले की, मृतदेह मुलागो येथील शहरातील शवागारात नेण्यात आले. हा अपघात ज्या शॉपिंग मॉलमध्ये घडला तो म्युझिक फेस्टिव्हल आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. काही दिवसांपूर्वी युगांडाची राजधानी कंपाला येथील ग्रामीण समुदायाच्या शाळेला लागलेल्या आगीत मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला होता.