शरद पवार यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल न करता घरीच उपचार सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवार यांचे चाहते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही शरद पवार यांना लवकर बरे वाटावे आणि ते पुन्हा एकदा सक्रीय व्हावे यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत