हिंदू धर्मीय भाद्रपद कृष्ण पंधरवडा हा पितृपंधरवडा म्हणून पाळतात. तिथी नुसार भाद्रपद कृष्ण पंधरवडामध्ये श्राद्ध केले जाते. या पंधरवड्याची सांगता सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी होते. त्यामुळे भाद्रपद कृष्ण अमावस्या ही विशेष महत्त्वाची असते.