Pitru Paksha 2020 : भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष हा पितृपक्ष (Pitru Paksha) म्हणून पाळला जातो. दरम्यन या 15 दिवसांमध्ये घरातील मृत व्यक्ती यमलोकातून मृत्यूलोकामध्ये येतात अशी धारणा आहे. त्यामुळे ते ज्या तिथीला मृत पावले असतील त्या दिनी स्मृतिदिन पाळून त्याचं स्मरण करण्याची पद्धत आहे. यंदा हा पितृपक्ष 2 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. तर 17 सप्टेंबर दिवशी सर्वपित्री अमावस्या (Sarvapitri Amavasya) आहे. हिंदू धर्मामध्ये पूर्वजांची पितृपूजा करण्याची वर्षानुवर्षांची जुनी परंपरा आहे. त्यामुळे दरवर्षी पितृपक्षामध्ये पितरांच्या स्मरनार्थ काही दिवस राखीव ठेवले जातात. यंदा तुमच्या परिवारातील देखील पूर्वजांच्या स्मरणार्थ श्राद्धाचा दिवस पाळणार असाल तर जाणून घ्या ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार कोणत्या दिवसाचं श्राद्ध कधी आहे?
पितृपक्ष 2020 तारखा आणि श्राद्धाचे दिवस
प्रतिपदा श्राद्ध - 2 सप्टेंबर
द्वितिया श्राद्ध - 3 सप्टेंबर
तृतीया श्राद्ध - 5 सप्टेंबर
चतुर्थी श्राद्ध - 6 सप्टेंबर
पंचमी श्राद्ध - 7 सप्टेंबर
षष्ठी श्राद्ध - 8 सप्टेंबर
सप्तमी श्राद्ध - 9 सप्टेंबर
अष्टमी श्राद्ध - 10 सप्टेंबर
नवमी श्राद्ध - 11 सप्टेंबर
दशमी श्राद्ध - 12 सप्टेंबर
एकादशी श्राद्ध - 13 सप्टेंबर
द्वादशी श्राद्ध - 14 सप्टेंबर
त्रयोदशी श्राद्ध - 15 सप्टेंबर
चतुर्दशी श्राद्ध- 16 सप्टेंबर
सर्वपित्री अमावस्या - 17 सप्टेंबर
दरम्यान पितृपंधरवठ्यामध्ये शुभ कामं, नव्या कामांचा शुभारंभ करण टाळलं जातं. पारंपारिक रिती रिवाजांनुसार पितृपक्षामध्ये श्राद्धाच्या संकल्पनेमागे वडील, आजोबा आणि पणजोबा हे तीन देवतांसमान मानले जातात. त्यानुसार वडीलांना वसू समान, आजोबांना रूद्र देवतांसमान आणि पणजोबांना आदित्य देवता समान मानलं जातं. यमराज दरवर्षी श्राद्धाच्या काळात सार्या जीवांना मुक्त करतो. आणि त्यांना प्रिय व्यक्तीकडे जाऊन तर्पण ग्रहण करण्याची मुभा असते.