गणेशोत्सवाच्या उत्साहवर्धक आणि चैतन्यमय आठवड्यानंतर भाद्रपद शुक्ल पंधरवड्यामध्ये हिंदू धर्मामध्ये पितृ पंधरवडा साजरा केला जातो. या काळात मृत्यू पावलेल्या आप्तजनांचं स्मरण केलं जातं. या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती, तृप्ती मिळावी यासाठी पूजा केली जाते.
25 सप्टेंबरपासून सुरू होणार श्राद्धकाळ
यंदा पितृपक्ष मंगळवार म्हणजेच 25 सप्टेंबरपासून 9 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या काळात ज्या तिथीला व्यक्तीचा मृत्यू झाला पंधरवड्यातील त्या तिथीला संबंधित व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पूजा केली जाते. तसेच अकाली, अपघातात मृत्यू झाल्यास किंवा त्या व्यक्तीच्या मृत्यूची तिथी ठाऊक नसल्यास सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पूजा करण्याची प्रथा आहे.
श्राद्धामागील पौराणिक कथा
पुराणा सांगितलेल्या एका कथेनुसार, यमराज दरवर्षी श्राद्धाच्या काळात सार्या जीवांना मुक्त करतो. या काळात ते आपल्या प्रिय व्यक्तींकडे जाऊ शकतात, तर्पण ग्रहण करू शकतात.
वडील, आजोबा आणि पणजोबा हे तीन देवतांसमान मानले जातात. त्यानुसार वडीलांना वसू समान, आजोबांना रूद्र देवतांसमान आणि पणजोबांना आदित्य देवता समान मानलं जातं.
श्राद्ध काळात म्हणजेच पितृ पंधरवड्यात कोणतेही शुभ कार्य, नवीन वस्तूंची खरेदी, नव्या कामाची सुरूवात केली जात नाही.
पहा कोणत्या दिवशी कोणतं कार्य
24 सप्टेंबर : पूर्णिमा श्राद्ध
25 सप्टेंबरः प्रतिपदा श्राद्ध
26 सप्टेंबरः द्वितीया श्राद्ध
27 सप्टेंबरः तृतीया श्राद्ध
28 सप्टेंबरः चतुर्थी श्राद्ध
29 सप्टेंबरः पंचमी श्राद्ध
30 सप्टेंबरः षष्ठी श्राद्ध
1 ऑक्टोबर : सप्तमी श्राद्ध
2 ऑक्टोबर : अष्टमी श्राद्ध
3 ऑक्टोबर : नवमी श्राद्ध
4 ऑक्टोबर : दशमी श्राद्ध
5 ऑक्टोबर : एकादशी श्राद्ध
6 ऑक्टोबर : द्वादशी श्राद्ध
7 ऑक्टोबर : त्रयोदशी श्राद्ध
8 ऑक्टोबर : सर्वपि अमावस्या