टीव्हीसाठी दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने जावेद अख्तर यांची बदनामी केल्या प्रकरणी अख्तर यांनी कंगना विरुद्ध तक्रार दाखल केली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली होती. अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात काल या खटल्यात कंगनाने हजेरी लावली.