Jaykumar Gore | (Photo Credits: Facebook)

Jaykumar Gore Nude Pictures Case: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर लैंगिक छळ (Harassment Allegations) आणि गौरवर्तनाचा आरोप झाला आहे. मंत्री गोरे यांनी एका महिलेस कथीतरित्या स्वत:चेच नग्न फोटो पाठवल्याचा धक्कादायक आरोप आहे. या आरोपानंतर प्रसारमाध्यमे आणि जनमानसात एकच खळबळ उडाली. चौफेर टीका सुरु झाली असतानाच मंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र झालेल्या आरपांचे तत्काळ खंडण करत, हे आरोप म्हणजे राजकीय बदनामीचा डाव असल्याचे म्हटले आहे. शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या मंत्र्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आणि तिचे अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप केला. सदर महिला येत्या काही दिवसांत विधिमंडळासमोर निदर्शने करण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.

संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ

प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मागणी केली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे. (हेही वाचा, BJP MLA Jaykumar Gore: 'सत्र न्यायालयात शरण जा', भाजप आमदार जयकुमार गोरे यांना सर्वाच्च न्यायालयाचा झटका; अटकपूर्व जामीन फेटाळला)

कायदेशीर कारवाईचा इशारा

दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, या आरोपांबद्दल मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. आपल्यावरील आरोपांचे खंडण करताना गोरे यांनी म्हटले आहे की, न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले आहे. केवळ राजकीय हेतूने निराधार आरोप करणाऱ्यांविरुद्ध मी कायदेशीर कारवाई करेन, असे गोरे म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले की, हा खटला 2017 चा आहे आणि 2019 मध्ये तो रद्द करण्यात आला. पण असे असतानाही विरोधकांनी केवळ खालच्या दर्जाचे राजकारण करत आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हा घाणेरडा आरोप केला.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने विरोधकांना बळ

संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराड आणि इतर गुन्हेगारांशी जवळकीचे संबंध असल्याच्या कारणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा नैतिकतेच्या कारणावरुन झाला असल्याचे सांगीतले. दरम्यान, या राजीनाम्यानंतर विरोधकांना बळ मिळाले असून, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी लवून धरली. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दावा केला की, मंत्र्यांनी पीडितेला पुन्हा धमकावले आहे. वडेट्टीवार यांनी गोरे यांचे थेट नाव घेण्याचे टाळले, तर शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी उघडपणे त्यांच्यावर आरोप केले आणि म्हटले की पीडिता विधानभवनाबाहेर उपोषणाची योजना आखत आहे. "या मंत्र्यांनी एका महिलेवर अत्याचार केला आहे आणि तिचा विनयभंग केला आहे. ती असहाय्य महिला येत्या काळात विधानभवनासमोर उपोषणाला बसेल," राऊत यांनी आरोप केला.