देशभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबईमध्ये दररोज  800 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. मुंबईमध्ये करण जोहरने केलेल्या  वाढदिवसाच्या ग्रँड पार्टीनंतर मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार होत असल्याचे अहवाल सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. करण जोहरच्या पार्टीनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतील स्टार्सही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आदित्य रॉय कपूरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.