LSG (Photo Credit - X)

Lucknow Super Giants vs Gujarat Titans, TATA IPL 2025 26th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 26 वा सामना आज म्हणजेच 12 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स (LSG vs GT) यांच्यात लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात, लखनौने गुजरातचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने लखनौसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवेल. लक्ष्याचा पाठलाग करण्यासठी आलेल्या लखनौने 19.3 षटकात लक्ष्य गाठले.

शुभमन गिल आणि साई सुदर्शनची अर्धशतकीय खेळी

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजराने 20 षटकात 6 गडी गमावून 180 धावा केल्या. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने 60 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याने 38 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्याशिवाय साई सुदर्शनने 56 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्स संघाकडून गोलंदाजीत शार्दुल ठाकूर आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

निकोलस पूरनची 61 धावांची स्फोटक खेळी

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने 19.3 षटकांत फक्त चार गडी गमावून लक्ष्य गाठले. लखनौ सुपर जायंट्ससाठी, स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, निकोलस पूरनने 34 चेंडूत एक चौकार आणि सात षटकार मारले. निकोलस पूरन व्यतिरिक्त, सलामीवीर एडेन मार्करामने 58 धावा केल्या. त्याच वेळी, गुजरात टायटन्सकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा व्यतिरिक्त, रशीद खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.