Yahoo Mobile सेवा बंद करण्याचा कंपनीचा निर्णय; 'या' तारखेनंतर घेता येणार नाही सेवेचा लाभ
Yahoo Mobile (Photo Credits: IANS)

याहू मोबाईल (Yahoo Mobile) फोन सर्व्हिसेसनी आपल्या सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ही माहिती याहू सर्व्हिसेसने (Yahoo Services) आपल्या अधिकृत वेबसाईटद्वारे दिली आहे. याहू मोबाईल फोन सर्व्हिसेस व्हेरिझोन नेटवर्कचा (Verizons Network) वापर करत होतं. मागील वर्षी मार्चमध्ये लॉन्च झाल्यानंतर याहू मोबाईल सर्व्हिसेसने आपला प्रसार वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आता अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे याहू मोबाईल सर्व्हिस वापरत असलेल्या ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. याहू मोबाईल सर्व्हिसेसच्या ग्राहकांनी व्हेरिझोन नेटवर्कच्या दुसऱ्या सर्व्हिसेसचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला याहू मोबाईलच्या वेबसाईटद्वारे देण्यात आला आहे. (Yahoo Mobile ने लॉन्च केला पहिला स्मार्टफोन ZTE Blade A3Y, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन)

व्हेरिझोन नेटवर्कने याहू ब्रँडला 2016 मध्ये 4.82 बिलियन डॉलरला विकत घेतले होते. मार्च 2020 मध्ये व्हेरिझोन तर्फे याहू मोबाईल लॉन्च करण्यात आला होता. या मोबाईलसोबत फक्त एकच ऑफर देण्यात आली होती.  ज्यामध्ये अनलिमिडेट टॉकटाईम, टेक्स आणि 4जी डेटा 40 डॉलर प्रति महिना उपलब्ध होता.

व्हेरिझोनने यापूर्वी व्हिजिबल नावाची फोन सर्व्हिस लॉन्च केली होती. ज्यामध्ये ब्लेड ए3 प्राईम आणि ब्लेड ए3 वाय हे दोन डिव्हाईस लॉन्च करण्यात आले होते. परंतु, ही सर्व्हिस यशस्वी न झाल्याने या सव्हिर्सेला रिब्रँड करुन याहू मोबाईल लॉन्च करण्यात आला होता.

मागील महिन्यात व्हेरिझोनने याहू सोबत आपले इतर ब्रँड ओपोलो ग्लोबल मॅनेजमेंट नामक कंपनीला विकले. याहू मोबाईल सर्व्हिसच्या कमी झालेल्या मार्केटिंग आणि ब्रँडींगमुळे ही मोबाईल सर्व्हिस लवकरच बंद पडण्याच्या मार्गावर होती. सध्या याहू मोबाईल सर्व्हिस वापरणारे ग्राहक अजून एक महिना या सेवेचा लाभ घेऊ शकतील. परंतु, 31 ऑगस्टपासून ही सेवा पूर्णपणे बंद झालेली असेल. YahooMobile.com किंवा Yahoo Mobile App चा वापर करुन या मोबाईल सर्व्हिसेसचे ग्राहक आपला मोबाईल नंबर ट्रान्सफर करु शकतील.