Yahoo Mobile ने लॉन्च केला पहिला स्मार्टफोन ZTE Blade A3Y, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
ZTE Blade A3Y (Photo Credits-Twitter)

गेल्या काही दिवसांपूर्वी अशी चर्चा सुरु होती की, Yahoo Mobile त्यांचा एक नवा स्मार्टफोन बाजारत उतरवणार आहे. तर आता Yahoo Mobile ने अखेर त्यांचा ZTE Blade A3Y स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीला सेल्फ ब्रँन्डेड स्मार्टफोन असून त्या अंतर्गत कंपनीने स्मार्टफोन मार्केट मध्ये एन्ट्री केली आहे. ZTE Blade A3Y हा ZTE च्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. मात्र बाजारात Yahoo ब्रँन्ड अंतर्गत तो विक्री केला जाणार आहे. या ब्रँन्डचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे.(Flipkart Big Diwali सेल मध्ये खरेदी करा 8 हजारांहून कमी किंमतीतील 'हे' दमदार स्मार्टफोन)

Yahoo Mobile ZTE Blade A3Y स्मार्टफोनची किंमत $50 म्हणजेच 3700 रुपये आहे. यामध्ये युजर्सला अनलिमिटेड टॉकटाइमसह 4G LTE डेटाची सुविधा दिली जाणार आहे. हा स्मार्टफोन Yahoo Mobile सर्विस आणि Verizon network सह उपलब्ध असणार आहे. जो नुकताच युएस मार्केटमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन ग्रेप जेली कलर वेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या अन्य देशात हा स्मार्टफोन कधी लॉन्च केला जाऊ शकतो याबद्दल अधिक खुलासा करण्यात आलेला नाही.

कंपनीच्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन आणि फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास यामद्ये 5.45 इंचाचा एचडी फुलविजन डिस्प्ले दिला गेला आहे. याचे स्क्रिन रेज्यॉल्यूशन 720X1440 पिक्सल आणि 18:9 आस्पेक्ट रेश्यो दिला गेला आहे. अॅन्ड्रॉइड ओएसवर आधारित हा स्मार्टफोन quad core MediaTek Helio A22 प्रोसेसरवर काम करणार आहे. यामध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 128GB पर्यंत वाढवता येणार आहे.(LG Wing आणि LG Velvet Dual Screen स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या या धमाकेदार फोन्सचे फिचर्स आणि किंमत)

या स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी युजर्सला 2660mAh ची बॅटरी दिली गेली आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 8MP चा रियर कॅमेरा दिला गेला आहे. जो ड्युअल एलईडी फ्लॅशसह येणार आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी आणि सेल्फी करिता स्मार्टफोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. त्याचसोबत युजर्सला फिंगरप्रिंट सेंसर बॅकपॅनल येथे दिले गेले आहे.