LG Wing आणि LG Velvet Dual Screen स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या या धमाकेदार फोन्सचे फिचर्स आणि किंमत
LG Wing & LG Velvet Dual Screen Smartphones Launched (Photo Credits: LG India)

LG India ने भारतात LG Wing आणि LG Velvet हे ड्युअल स्क्रिन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हे स्मार्टफोन्स नक्कीच लक्षवेधी आहेत. तर जाणून घेऊया या धमाकेदार स्मार्टफोन्सचे फिचर्स आणि किंमत. LG Velvet स्मार्टफोन ड्युअल स्क्रिन कॉम्बो सह 49,990 रुपयांना उपलब्ध आहे. दरम्यान, या 30 ऑक्टोबर पासून या स्मार्टफोनचा सेल सुरु होत आहे. तर LG Wing स्मार्टफोनची किंमत 69,990 रुपये असून 9 नोव्हेंबर पासून याचा सेल सुरु होणार आहे. LG Wing मध्ये 6.8 इंचाचा curved flawless P-OLED FHD+ डिस्प्ले आहे. त्याचबरोबर 3.9-inch G-OLED चा दुसरा डिस्प्ले देखील यात पाहायला मिळतो. यात क्वॉलकॉम स्पॅनड्रगन 765G चिपसेट प्रोसेसर असून 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात वायरलेस चार्गिंग टेक्नॉलॉजी 4,000mAh बॅटरी सह देण्यात आली आहे.

यात ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टम 64MP अल्ट्रा हाय रिजोल्यूशनचा मेन कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा वाईल्ड एगल लेन्स आणि 13MP चा अल्ट्रा व्हाईड स्नॅपर देण्यात आला आहे. सेल्फी, व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देम्यात आला आहे. याच्या instant gimbal मध्ये 6 मोशन्स सेन्सर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे LG Wing स्मार्टफोनमध्ये फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्याने एकाच वेळी रेकॉर्डिंग करु शकाल.

LG Wing Smartphone (Photo Credits: Ev Leaks)
‘LG Wing’ Name Confirmed for LG’s Dual Rotating Screen Smartphone (Photo Credits: Techno Ankit 1)

LG Velvet स्मार्टफोनमध्ये 6.8-inch FHD+ cinematic POLED डिस्प्ले देण्यात आला असून याचा आस्पेक्ट रेशो 20.5:9 इतका आहे. यात 6.8-inch चा दुसरा HD+ डिस्प्ले 2460x1080 पिक्सल रेजोल्यूशनसह देण्यात आला आहे, या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 845 प्रोसेसर असून यात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही हा स्टोरेज 2TB पर्यंत वाढवू शकता.

LG Velvet (Photo Credits: LG India)

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप 48MP मेन लेन्स, दुसरा 8MP आणि डेप्थ सेन्सर 5MP चा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4,300mAh ची लॉन्ग लास्टिंग बॅटरी असून क्वॉलकॉम क्विक चार्ज 4+ सपोर्टही देण्यात आला आहे. यात कनेक्टीव्हीटीसाठी LTE, Wi-Fi 802.11, Bluetooth 5.1, NFC आणि SB Type-C port देण्यात आला आहे.