Xiaomi Mi 10 Smartphone (Photo Credits: XIaomi India)

चीनी स्मार्टफोन निर्माता शाओमी (Xiaom) लवकरच भारतीय बाजारात काही नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे. यामध्ये कंपनी प्रथम 108 मेगापिक्सल असलेला मी 10 (Mi 10) लाँच करेल. शाओमी आपला नवीन मी 10 हा फोन 8 मे रोजी भारतात सादर करणार आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कंपनी हा फोन ऑनलाइन 10 लॉन्च करेल. शाओमीचे ग्लोबल वाइस प्रेसिडेंट आणि इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी एक ट्विट करत याबाबत माहिती दिली. यासह त्यांनी इतर अनेक फोन लाँचिंगच्या तयारीत असल्याचे सांगितले आहे.

Mi 10 मध्ये 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे आणि हे या फोनचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. हा कंपनीचा प्रमुख स्मार्टफोन आहे आणि सामान्यत: कंपनी आपला फ्लॅगशिप भारतात लाँच करत नाही. Mi 10 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर आधारीत MIUI 11 वर चालतो. फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल-एचडी + (1,080 × 2,340 पिक्सेल) अर्व्ह AMOLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटच्या डिस्प्ले सपोर्टसह आला आहे.

स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 12 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. बॅटरी क्षमतेबद्दल सांगायचे तर, फोनमध्ये 4,780 एमएएचची बॅटरी आहे, जी 30 वॅट वायर्ड चार्जिंग आणि 30 वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोनच्या मागील बाजूस चार रियर कॅमेरे आहेत. या फोनमध्ये 108 एमपी प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 13 एमपी वाइड-एंगल लेन्स आणि दोन 2 एमपी कॅमेरा सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20 एमपी फ्रंट कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आला आहे. (हेही वाचा: Samsung Galaxy M21 New Prices: सॅमसंग गॅलेक्सी एम 21 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घट; जाणून घ्या नवी किंमत)

शाओमीने अद्याप Mi 10 स्मार्टफोनची किंमत भारतात काय असेल याचा खुलासा केला नाही, परंतु काही काळापूर्वी शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी पुष्टी केली होती, भारतात या हँडसेटची किंमत चीनच्या बाजारापेक्षा थोडी वेगळी असणार आहे. चीनी बाजारात या फोनची प्रारंभिक किंमत 3999 चिनी युआन (सुमारे 42,400 रुपये) आहे, यावरून या फोनची भारतातल्या किंमतीचा अंदाज लावता येईल.