दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने (Samsung) भारतीय बाजारात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. नुकताच सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी एम 21 (Samsung Galaxy M21) हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यातच सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी एम 21 च्या किंमतीत आणखी घट करून स्मार्टफोन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तसेच हा सॅमसंग कंपनीचा सर्वात स्वस्त किंमतीचा स्मार्टफोन आहे. सुरुवातीला या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 999 इतकी होती. भारतात सॅमसंग गॅलेक्सी एम 21 हा स्मार्टफोन 12 हजार 999 रुपयात लॉन्च केला होता. मात्र, जीएसटी दर लागू झाल्याने स्मार्टफोनची किंमतीत वाढ झाली होती. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकाला सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईट किंवा अमेझॉनवरून खरेदी करता येऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एम 21 ची नवी किमंत 12 हजार 699 रुपये इतकी आहे. यात किमतीत ग्राहकाला 4 जीबी रॅम आणि 64 जीबीचा स्टोरेज देण्यात आला आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेसा स्मार्टफोनची किंमत 14 हजार 999 रुपये इतकी आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 21 मध्ये 6.4 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय यात 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5 मेगापिक्सल डेफ्थ सेंसरचा समावेश करण्यात आला आहे. एवढेच नव्हेतर, या स्मार्टफोनमध्ये 20 सेल्फी कॅमेऱ्याचा देण्यात आला आहे. तसेच गॅलेक्सी एम 21 मध्ये 6000 एमएएचची बॅटरी दिली आहे. हे देखील वाचा- लोकप्रिय Google डूडल गेम 'स्कोविल' Popular Google Doodle Games सीरीजमधला 6 वा खेळ!
सॅमसंग कंपनीने बाजारात अनेक स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मात्र, सॅमसंग गॅलेक्सी एम 21 हा कंपनीचा सर्वाधिक स्वस्त किंमतीचा स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यानंतर खळबळ निर्माण निर्माण करेल. तसेच स्मार्टफोन चाहत्यांना मना राज्य करेल, असा विश्वास सॅमसंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.