प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

स्मार्टफोन गरम होणे किंवा फोनच्या बॅटरीचा स्फोट होणे हे प्रकार सध्या सामान्य झाले आहेत. असा प्रकार होण्यामागे काही कारणे सुद्धा आहेतच. याच पार्श्वभुमीवर गुरुग्राम येथील एक नवी घटना समोर आली आहे. त्यानुसार शाओमी (Xiaomi) कंपनीच्या रेडमी नोट 7 प्रो (Redmi Note 7Pro) स्मार्टफोनच्या बॅटरीची स्फोट झाला आहे. मोबाईल शिखात ठेवला असता त्याची बॅटरी गरम होऊन त्याचा अचानक स्फोट झाला. यावर तरुणाने तो स्मार्टफोन सर्विस सेंटरमध्ये दाखवण्यास नेला असता त्याने फोनची अर्धी किंमत त्यांच्याकडे मागितली. परंतु सर्विस सेंटरने त्या तरुणालाच या घटनेप्रकरणी जबाबदार ठरवले आहे.

91mobiles यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, विकेश कुमार नावाच्या तरुणाने गेल्या वर्षात डिसेंबर महिन्याच शाओमी कंपनीचा रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोन खरेदी केला होता. मात्र अचानक मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. पण सर्विस सेंटरकडून स्मार्टफोनचे अर्धे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने सोशल मीडियात याबाबतचा अधिक खुलासा केला आहे. विकेश याने घरातून निघण्यापूर्वी स्मार्टफोन 90 टक्के चार्जिंग केला होता. तर ऑफिसमध्ये पोहचल्यावर फोन गरम होत त्याच्या बॅटरीचा स्फोट झाला.(Realme 6, Realme 6 Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या स्मार्टफोनचे दमदार फिचर्स)

दरम्यान, स्मार्टफोन मर्यादेपेक्षा अधिक चार्ज केल्यास तो गरम होते. तर चार्जिंग करताना काही गोष्टींची काळजी सुद्धा घेणे तितकेच आवश्यक आहे. ग्राहकांनी स्मार्टफोन सोबत येणाऱ्या चार्जरनेच फोन चार्ज करावा. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या दुसऱ्या चार्जरने फोन चार्ज करता त्यावेळी त्याची बॅटरी गरम झाल्याची तक्रार केली जाते. कारण स्मार्टफोनला जेवढी पॉवर मिळायला हवी ती मिळत नसल्याने तो गरम होतो. ऐवढेच नाही तर फोनची बॅटरी 80 टक्क्यापेक्षा अधिक चार्ज करु नका. अधिक चार्ज केल्यास फोन ओव्हरहीट होण्याची शक्यता असते.