Realme 6, Realme 6 Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या स्मार्टफोनचे दमदार फिचर्स
Realme 6 (photo Credits-Twitter)

रिअलमी 6 (Realme 6)  आणि रिअलमी 6 प्रो (Realme 6 Pro) स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या खासियत बाबत बोलायचे झाल्यास नव्या रिअलमी 6 सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 64MP प्रायमरी कॅमेरा सेंसर पेक्षा कमी आहे. तर रिअलमी 6 प्रो मध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. यासाठी ग्राहकांना 16,99 रुपये मोजावे लागणार आहेत. तर जाणून घ्या रिअलमी 6 आणि रिअलमी 6 प्रो या स्मार्टफोसाठी कोणते फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच हा स्मार्टफोन तुमच्या शिखाला परवडणार आहे की नाही हे सुद्धा तु्म्हाला कळू शकणार आहे.

>>रिअलमी 6 स्मार्टफोन:

रिअलमी 6 च्या 4 जीबी आणि 64 जीबी स्टोरेजच्या वेरियंटची किंमत 12,99 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरियंटसाठी 14,999 रुपये आणि 8 जीबी रॅम/128 जीबी सटोरेज असणाऱ्या टॉप वेरियंटसाठी 15,999 रुपये मोजावे लागणार आहेत. हा स्मार्टफोन कॉमेट ब्लू आणि कॉमेट व्हाइट रंगात लॉन्च करण्यात आला आहे. रिअलमी 6 स्मार्टफोनचा पहिला सेल 11 मार्चला फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर असणार आहे.

>>रिअलमी 6 स्मार्टफोन फिचर्स:

नव्या रिअलमी 6 स्मार्टफोनसाठी 6.5 इंचाच फुल HD+ 90 हर्ट्स अल्ट्रा स्मुथ डिस्प्ले आहे. स्क्रिन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ली ग्लास 3 चा वापर करण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी रिअलमी 6 मध्ये लेटेस्ट मीडियाटेक हिलिओ जी90 टी प्रोसेसपसह 8 जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, रिअलमी 6 फ्लॅगशिप लेव्हल गेमिंग परऑर्मेंससह दिला आहे. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. यामध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा सेंसर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंड कॅमेरा सेंसर दिला आहे.(भारतात लवकरच Oppo Reno 3 Pro स्मार्टफोन होणार लॉन्च; 44 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह अनेक धमाकेदार फिचर्सचा समावेश)

>>रिअलमी 6 प्रो स्मार्टफोन:

रिअलमी 6 प्रो स्मार्टफोनच्या 6 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 16,99 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 17,999 रुपये आणि 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या टॉप वेरियंटची किंमत 18,999 रुपये आहे. ग्राहकांना रिअलमी 6 प्रो लायटिंग ब्लू आणि लायटिंग ऑरेंज रंगात खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनच्या सेल बाबत बोलायचे झाल्यास पहिला सेल येत्या 13 मार्चला फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर असणार आहे.

>>रिअलमी 6 प्रो स्मार्टफोन फिचर्स:

या स्मार्टफोनच्या फिचर्समध्ये ग्राहकांना 6.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले+ अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले, स्क्रिन टू बॉडी रेशियो 90.6 टक्के आहे. फोनचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आणि सॅपलिंग रेट 120 हर्ट्ज आहे. स्क्रिन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर केला आहे. रिअमी 6 प्रो हा भारतातील असा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720जी प्रोसेसरचा वापर केला आहे. ग्राफिक्साठी अॅड्रेनो 618 जीपीयू सुद्धा आहे. कॅमेऱ्यासाठी मागील बाजूस क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 16MP आणि 8MP चे कॅमेरे असणार आहेत.