भारतात लवकरच Oppo Reno 3 Pro स्मार्टफोन होणार लॉन्च; 44 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह अनेक धमाकेदार फिचर्सचा समावेश
Oppo Reno 3 Pro (Photo Credit: Twitter)

भारतात ओप्पो (Oppo) कंपनानी कमी चांगलीच प्रसिद्ध मिळवली आहे. सध्या भारतीय बाजारात स्मार्टफोन चाहते ओप्पो कंपनीच्या स्मार्टफोनला पसंती देत आहेत. ओप्पो कंपनी त्यांच्या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्याच्या वैशिष्टांमुळे अधिक ओळखले जातात. यातच ओप्पो कंपनीने 44 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला ओप्पो रेनो 3 प्रो (Oppo Reno 3 Pro) हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारतात ओप्पो कंपनीचा रेनो 3 प्रो हा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार याकडे सर्व स्मार्टफोन चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच ओप्पो कंपनीने ओप्पो रेनो 3 प्रो ऑर्डर घेणेही सुरू केले असून या स्मार्टफोन खरेदीवर सूटदेखील दिली जात आहे. या स्मार्टफोनची प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना निवडक बँकेंच्या कार्ड्सवर 10 टक्के कॅशबॅक ऑफर दिली जात आहे, असेही समजत आहे.

भारतात लॉन्च होणाऱ्या ओप्पो रेनो 3 प्रो स्मार्टफोनने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. सध्या बाजारात शाओमी कंपनीचा स्मोर्टफोनची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत. परंतु, ओप्पो कंपनीचा रेनो 3 प्रो स्मार्टफोन भारतात लॉन्च झाल्यानंतर इतर कंपनीला धोका निर्माण होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हे देखील वाचा- HTC Wildfire R70 भारतात लॉन्च, युजर्सला मिळणार जबरदस्त फिचर्स

ट्वीट-

या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा AMOLED डिस्प्ले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 44 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पिल-शेप होल पंच कटआऊट दिला आहे. चीनमधील याच मॉडेलवर 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला होता. रियरमध्ये फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, 13 मेगापिक्सलचा टेलिफोटो आणि 3 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाइट सेन्सर दिला आहे. हा 4 के व्हिडिओ रिकॉर्डिंग 30 एफपीएस वर सपोर्ट दिला आहे. ओप्पोचा हा फोन दोन पर्यायात म्हणजेच 8 जीबी प्लस 128 जीबी आणि 12 जीबी प्लस 256 जीबीमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये ४ हजार 025 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.