
शाओमी या स्मार्टफोन उत्पादक चीनी कंपनीने आपले Xiaomi Mi 10 आणि Mi 10 Pro हे दोन्ही फोन मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन क्वालकॉम स्नैपड्रैगन 865 यांसारख्या दमदार प्रोसेसरसोबत येतात. विशेष म्हणजे या फोनमध्ये तब्बल 108 मेगापिक्सल रियर कॅमेरा आहे. शाओमी Mi 10 ची 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 3,999 युआन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये तब्बल 40,000 रुपये तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरियंट ची किंमत 4,299 युआन म्हणजेच भारतीय रुपयांत सुमारे 43,000 रुपये इतकी असल्याचे समजते. किमतीबद्दल निश्चित माहिती समजू शकली नाही.
Xiaomi Mi 1 फिचर्स
- 6.67 इंच फूल एचडी+ कर्व्ड AMOLED डिस्प्ले
- 90Hz चा रिफ्रेश रेट वाला हा डिस्प्ले पंच-होल डिजाइन सोबत उपलब्द आहे.
- रियर कॅमेरा सेटअप
- प्राइमरी सेंसर 108 मेगापिक्सल, 13 मेगापिक्सल वाइड ऐंगल सेंसर, आणि दोन 2 मेगापिक्सल सेंसरही उपलब्ध
- 8K रेजॉलूशन वाला विडियो शुटींग करण्याची सोय.
फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सल
- 4,780mAh ची बॅटरी (30W वायर आणि वायरलेस दोन्ही पद्धतीने चार्जिंग सपोर्ट)
रिवर्स वायरलेस चार्जिंग फिचरही आहे. (हेही वाचा, शाओमी कंपनीचा धमाकेदार Xiaomi Mi 10 स्मार्टफोन आज होणार लॉन्च; फिचर्स आणि किंमत घ्या जाणून)
शाओमी Mi 10 Pro फिचर्स
- शाओमी Mi 10 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचचाचा फुल एचडी+ HDR10+ AMOLED डिस्प्ले
- हा डिस्ल्पे 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येतो
- कॅमेरा प्राइमरी सेंसर 108 मेगापिक्सल (यात 20 मेगापिक्सल चा वाइड अँगल सेंसर, एक 12 मेगापिक्सल आणि एक 8 मेगापिक्सल सेंसर)
- फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सल
- फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 50W वायर आणि 30W वायरलेस चार्जिंग सपॉर्ट करते.
- या फोनला रिवर्स वायरलेस चार्जिंग फीचर सुद्धा देण्यात आले आहे.
शिओमी कंपनीने एक व्हिडिओ शेअर करत एमआय 10 स्मार्टफोने प्रमोशन केले होते. या व्हिडिओत या दोन्ही स्मार्टफोनचे फिचर्स सांगण्यात आले होते. दरम्यान, शीओमी कंपनीचे सीईओ लू जून यांनी हा व्हिडिओ शेअर करत हे दोन्ही फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरतील. ग्राहक या फोनचे स्वागत करतील असे म्हटले होते.