शाओमी कंपनीचा धमाकेदार Xiaomi Mi 10 स्मार्टफोन आज होणार लॉन्च; फिचर्स आणि किंमत घ्या जाणून
Xiaomi Mi 10 (Photo Credit: Twitter)

भारतात चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने मोठी प्रसिद्ध मिळवली आहे. भारतात शाओमीने त्यांच्या कंपनीचे स्मार्टफोन लॉन्च करून अनेकांना आकर्षित केले आहे. शाओमीच्या नव्या फोनबाबत ग्राहकांमध्ये नेहमीच कमालीची उस्तुकत असते. यातच शाओमी कंपनी स्मार्टफोन चाहत्यांसाठी धमाकेदार फिचर्स असलेला शाओमी एमआय 10 घेऊन येत आहे. भारतीय बाजरात शाओमी एमआय10 स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. याआधी शाओमी कंपनीने एमआय 10 स्मार्टफोनचा प्रमोशनल व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. या व्हिडिओत एमआय10 स्मार्टफोनचे फिचर्स दाखवण्यात आले आहेत. शाओमी कपनीचे सीईओ ली जून यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच शाओमी एमआय10 अनेकांना पसंद येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

शाओमी एमआय10 चे फिचर्स-

शाओमी एमआय10 मध्ये 90Hz चा डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय क्वाड रिअर कॅमेरा सेटअपही देण्यात आला आहे. एमआय 10 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी 2019 मध्ये लॉन्च झालेल्या एमआय9 चे अपग्रेड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआय10 108 मेगापिक्सल पेन्ट कॅमेरा सेटअप सह 16 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच एलपीडीडीआर 5 रॅम असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

ट्विट-

भारतात शाओमी कंपनीने सर्वांचे लक्ष आकर्षित करुन घेतले आहे. शाओमी कंपनी बाजारात आल्यापासून इतर स्मार्टफोन कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर, ऍपल, सोनी, सॅमसंग, नोकिया कंपनीच्या वापरकर्त्येही आता शाओमी कंपनीला पसंती दाखवत आहेत. शाओमी कंपनीने गेल्या काही महिन्यात एमआयसीप्रो लॉन्च केला होता. या स्मार्टफोनलाही मोठी विक्री झाल्याचे कळते आहे.