शाओमी कंपनीने शुक्रवारी त्यांच्या MIJIA ब्रॅन्ड अंतर्गत नवे प्रोडक्ट लॉन्च केले आहे. कंपनीने MIJIA Smart Oven लॉन्च केले असून क्राउडफंडिंग 26 ऑगस्ट पासुन सुरु होणार आहे. शाओमीच्या पोर्टफिलियो मध्ये आधीपासूनच काही नवे प्रोडक्ट्स जसे वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, कुकर यांचा समावेश आहे. तर शाओमीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर असे म्हटले आहे की, नवा मीजिया स्मार्ट ओव्हन ज्याची 30 लीटरची क्षमता आहे. हा वर्टिकल बॉडी डिझाइनपेक्षा लैस आहे.(जगभरात 235 मिलियन Instagram, TikTok आणि YouTube Profiles चा डाटा लीक - रिपोर्ट)
कंपनीच्या नव्या ओव्हनसाठी विविध कुकिंग मोड सुद्धा दिले आहेत. यामध्ये रोस्टिंग, स्टिमिंग आणि फ्राइंश यांचा समावेश आहे. तसेच स्टीम आउटपुटसाठी 30 सेकंद स्ट्युइंग सुद्धा आहे. प्रोडक्ट एक स्मार्ट लिंक ही सपोर्ट करतो म्हणजेच तो मीजिया स्मार्ट होम अॅप्लिकेशन सोबत कनेक्ट केला जाऊ शकतो.(Samsung कंपनीचा मोठा निर्णय; भारतामध्ये 5 वर्षांत बनवणार 3.7 लाख कोटी रुपयांचे स्मार्टफोन)
शाओमी MIJIA स्मार्ट ओव्हन सिंगल कलर बॉडी मध्ये येणार आहे. याची डिझाइन सुद्धा उत्तम आहे. ओव्हनच्या वरती डाव्या बाजूला सर्कुलर डायल असून त्यावर महत्वाची माहिती सुद्धा दिलेली आहे. कंपनीची ही योजना या स्मार्ट ओव्हनला क्राउडफंडिंगच्या माध्यमातून जवळजवळ 14 हजार रुपयांत विक्री करण्यात येणार आहे. तसेच याची रिटेल किंमत 16 हजार रुपये असणार आहे.
तर काही दिवसांपूर्वी शाओमी कंपनीने आपल्या 10 वर्षे पूर्ततेच्या निमित्ताने एक खास प्रकारचा ट्रान्सपरंट (Transparent TV) म्हणजेच पारदर्शक टीव्ही बाजारात आणला आहे. हा टीव्ही Mi TV LUX OLED Transparent Edition या नावाने चिनी बाजारात सादर केला गेला आहे. याची किंमत 49,999 आरएमबी (सुमारे 5.37 लाख रुपये) आहे.