Xiaomi Black Shark 2 स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार धमाकेदार फिचर्ससह
Xiaomi Black Shark 2 (Photo Credits- Twitter)

चीनी (China) स्मार्टफोन कंपनी निर्माता शाओमी (Xiaomi) त्यांचे नवे मॉडेल असलेला गेमिंग स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, शाओमीचा Black Shark 2 हा स्मार्टफोन येत्या 18 मार्च रोजी चीन मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनसाठी क्वॉलकॉमचे स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच 12GB RAM देण्यात आला आहे.

हँडसेट लिक्विड कूल 3.0 टेक्नॉलॉजीसह फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की, अॅन्ड्रॉईड 9.0 पाई ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. शाओमी रेडमी नोट 7 प्रो सारखीच या स्मार्टफोनसाठी 4000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.(हेही वाचा-Xiaomi Redmi Note 7 चा आज पहिला फ्लॅश सेल)

चीन मध्ये लॉन्च केल्यानंतर युरोप मध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र भारतात कधी लॉन्च होणार याबाबत कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही. ब्लॅक शार्क 2 हा स्मार्टफोन ब्राईटर इमेज कॅपचर करु शकणार आहे. त्याचसोबत 4GB आणि 6GB RAM देण्यात आला आहे.