Xiaomi Redmi Note 7 चा आज पहिला फ्लॅश सेल; Flipkart, Mi.com/in वर दुपारी 12 पासून विक्री सुरु
Xiaomi Redmi Note 7 (Photo Credits: Twitter)

Xiaomi Redmi Note 7 Sale: काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेल्या शाओमी रेडमी नोट 7 (Xiaomi Redmi Note 7) फोनचा आज (6 मार्च) पहिला फ्लॅश सेल आहे. फ्लिपकार्ट आणि Mi.com/in या दोन साईटवर आज (6 मार्च) दुपारी 12 वाजल्यापासून या फोनची विक्री सुरु होईल. या सेलमध्ये रेडमी नोट 7 खरेदी करणाऱ्या ग्राहकाला जिओच्या 398 रुपयांच्या रिचार्जवर दुप्पट डेटा मिळणार आहे. ही ऑफर 4 रिचार्जपर्यंत मर्यादीत आहे. तसंच फोन खरेदी करणाऱ्यांना माय जिओ अॅपअंतर्गत 299 रुपयांच्या रिचार्जवर 2 हजार 400 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. जिओसोबतच एअरटेल देखील 249 रुपयांच्या रिचार्जवर दुप्पट डेटा देणार आहे.

फोनची किंमत:

3 जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 9,999 रुपये तर 4 जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 11,999 रुपये इतकी असेल. हा फोन Onyx Black, Ruby Red आणि Sapphire Blue या रंगात उपलब्ध आहे.

फोनचे फिचर्स:

या फोनमध्ये 6.3 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह क्वॉलकॉमचा ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 660SoC प्रोसेसरही यात आहे.

32 आणि 64 जीबी स्टोरेज असे दोन पर्याय उपलब्ध असून मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही याची स्टोरेज क्षमता वाढवू शकता.

48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल असे ड्युअल कॅमेरे यात देण्यात आले आहेत. तर सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात 3.3 एमएमचा ऑडिओ जॅकही देण्यात आला आहे.