Zanco tiny t2: जगातील सर्वात छोटा 2.4 इंचाचा स्मार्टफोन लाँच; 7 दिवस चालते याची बॅटरी लाईफ, वाचा सविस्तर
Zanco Tiny T2 (Photo Credits: Twitter)

डिजिटल युगात प्रतिष्ठेचे प्रतीक बनलेल्या स्मार्टफोनचा आकार हा देखील महत्त्वाचा मानला जातो. कारण वेबसीरिज, चित्रपट पाहणं, व्हिडिओ कॉलिंग करणे हा प्रकार सर्रासपणे होताना दिसतो. तरीही आपल्यापैकी अशी बरीच लोक आहेत ज्यांना आपल्या स्मार्टफोन लहान असावा जेणे करुन तो हाताळणे सोपे जाईल असे वाटत असते. अशा लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. युकेमधील जगप्रसिद्ध कंपनी Zini Mobiles आपला सर्वात स्वस्त आणि छोट्या आकाराचा स्मार्टफोन Zanco tiny t1 लाँच केला आहे. या स्मार्टफोनचा आकार सर्वात छोटा म्हणजे 2.4 इंच इतका आहे. या स्मार्टफोनचे वजन केवळ 31 ग्रॅम आहे.

Zanco tiny t1 हा 3G डिव्हाईस असून यात ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी असणार आहे. शिवाय SOS मेसेजेची सुविधाही आहे. युजर्सना हा फोन वेबसाइटवरून बूक करता येणार आहे. यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. मल्टिपल फीचर्स असलेल्या या फोनमध्ये कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डिंग, MP3 आणि MP4 प्लेबॅक, गेम्स, कॅलेंडर ही फीचर्स आहेत.

या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, फोनमध्ये कॉलिंग, टेक्स्ट मेसेजची सुविधाही असेल. मेमरीच्या बाबतीत सांगायचे तर त्यात 32 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येते. यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- WhatsApp येत्या 1 फेब्रुवारी पासून 'या' स्मार्टफोनमध्ये होणार बंद

एवढ्याशा फोनमध्ये बिल्ट इन कॅमेराही आहे. फोटो क्लिक केल्यानंतर एसडी कार्डवरून फोटो दुसऱ्या फोनमध्ये पाठवता येतात. या फोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 7 दिवस टिकेल असा दावा करण्यात आला आहे.

Paytm युजर्सला झटका, वॉलेटमध्ये पैसे भरणे होणार महाग  - Watch VIdeo 

हा स्मार्टफोन दिसायला जितका छोटा आहे तितकीच त्याची छोटी आणि स्वस किंमत आहे. सुपर अर्ली बर्ड रिवॉर्डमध्ये हा फोन 4 हजार 200 रुपयांपर्यंत खरेदी करता येतो. सध्या अर्ली बर्ड रिवॉर्डमध्ये ही किंमत 4 हजार 900 रुपये असून किकस्टार्टर स्पेशल पॅक 5 हजार 600 रुपयांत खरेदी करता येणार आहे.