WhatsApp येत्या 1 फेब्रुवारी पासून 'या' स्मार्टफोनमध्ये होणार बंद
WhatsApp | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

जगप्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. कारण येत्या 1 फेब्रुवारी पासून काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप काम करणे बंद करणार आहे. त्यामुळे युजर्सला नवे अकाउंट बनवणे किंवा सध्याचे अकाउंट वेरिफाय करता येणार नाही आहे. याबाबत गेल्या वर्षातच सुचना देण्यात आली होती. तर अ‍ॅन्ड्रॉइड वर्जन 2.3.7 आणि iOS 8 पेक्षा जुने वर्जनमध्ये काम करणार नाही आहे.

मात्र युजर्सला सध्याच्या लेटेस्ट आयओएस वर्जनच्या माध्यमातून डाऊनलोड करता येणार आहे. iOS 9 आणि 4s त्यानंतरच्या सर्व आयफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरु राहणार आहे. मात्र जर तुमच्याकडे कोणत्या वर्जनचे व्हॉट्सअ‍ॅप आहे हे जर तपासून पहायचे असल्यात ते तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन कळणार आहे. दुसऱ्या बाजूला आयफोन युजर्सला सुद्धा त्याच पद्धतीने वर्जन कोणते आहे ते कळणार आहे. मात्र जुने वर्जन असल्यात आताच ते अपडेट करा. काही दिवसांपूर्वी कंपनीने 31 डिसेंबर 2019 मध्ये सर्व विंडोज स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नसल्याचे घोषित केले होचे. मात्र 1 जुलै 2019 मधील सर्व मायक्रोसॉप्ट स्टोरसाठी सुद्धा बंद करण्यात आले आहे.(WhatsApp वर खोटे मेसेज व्हायरल, चुकून सुद्धा त्यावर क्लिक करु नका)

तर आता डिलिट मेसेज नावाचे फिचर आले असुन त्याचा फायदा युजर्सला होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जरी व्हॉट्सअ‍ॅपवरील एखादा मेसेज तुमच्याकडून चुकून डिलिट झाल्यात तो पुन्हा मिळवता येणार आहे. मात्र लक्षात असू द्या डिलिट झालेला मेसेज बॅकअप घेतल्यानंतर आला असल्यास तो पुन्हा परत येऊ शकत नाही.