प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना फसणवूकीचे प्रकार वाढत चालले आहेत. तर फसवणूक करणाऱ्या व्यक्ती नागरिकांच्या मोबाईलवर ऑफर बाबत खोटा मेसेज पाठवून त्यांची लूट करत आहेत. त्यामुळे आता सध्या ही युजर्सच्या फोनवर New Year Virus च्या माध्यमातून फसवले जात आहे. त्यामध्ये हॅकर्स ऑफर असल्याचे भासवत एक लिंक युजर्सला पाठवतात. त्यामुळे लिंकवर एखाद्या व्यक्तीने क्लिक केल्यास खोटी वेबसाईट मोबाईलच्या स्क्रिनवर सुरु होते. त्यामुळे हॅकर्सला युजर्सचा डेटा चोरी करणे सहज सोपे होते. तर काही जाहीरांच्या माध्यमातून सब्सक्रिप्शन करण्यास सुद्धा सांगण्यात येते. मात्र त्यावेळी युजर्सची वैयक्तिक माहिती मागितली जाते.

रिपोर्टनुसार असे सांगण्यात आले आहे की, खोटे मेसेज खासकरुन ग्रिटिंग्स सोबत पाठवले जातात. त्यामुळे अशा मेसेजवर क्लिक न करता सुद्धा पाहता येते. व्हॉट्सअॅप हे जगभरातील सर्वाधिक प्रसिद्ध मेसेजिंग अॅप असून त्याच्या माध्यमातून हॅकर्स सहज एखाद्याचा डेटा हॅक करतात. यापूर्वी सुद्धा व्हॉट्सअॅपवर खोटे मेसेज व्हायरल झाल्याचे दिसून आले होते. तर 2018 मध्ये आदिदास कंपनीचे शूज फुकटात मिळत असल्याचा मेसेज व्हायरल करण्यात आला होता.(Online Fraud Case: ऑनलाईन फसवणुकीच्या संख्येत वाढ; या पद्धतीने केली जाते अनेकांची लूट)

 सर्वात सुरक्षित मानला जाणाऱ्या व्हॉट्सअॅप मध्ये बग आढळून आल्याने हॅक करणे सोपे होते. याचा फटका जगभरातील 1400 लोकांना बसला. तर ब्रिटेन मधील संशोधकांनी नुकत्याच एका रिपोर्ट मध्ये असे म्हटले आहे की, अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोनला हॅक करण्याचा सर्वाधिक धोका आहे. कारण हॅकर्स बहुतांश प्रमाणात आयफोन धारकांचा डेटा चोरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात.