इंटरनेटशिवाय आजच्या आधुनिक जगाची कल्पना करणे कठीण आहे. इंटरनेट हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. ऑनलाइन जगाने  सर्वकाही आपल्या बोटांच्या टोकावर आणून ठेवले आहे. परंतु, इंटरनेट हे फसवणूकीचे साधनदेखील (Online Fraud Case) बनत चालत आहे. यावर्षी 2019 मध्ये ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकरण आपल्या कानावर पडली आहेत. यावर कसा आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जातात. महत्वाचे म्हणजे, ऑनलाईन माध्यमातून कशाप्रकारे फसणवूक केली जाते, याची कल्पना नसल्यामुळे अनेकांचे नुकसान होते. यामुळे खालील माहिती तुमच्या फायद्याची ठरणार आहे.

गूगल-

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल आमच्या दैनंदिन कामांचा एक भाग बनला आहे. आपल्याला पडलेले अनेक प्रश्नाचे उत्तर इंटरनेटवर सहज मिळते. यालाच फसवणूक करण्याऱ्यांनी प्लॅटफार्म बनवले आहे. यातूनच कोट्यावधी रुपयांची लूटमार केली जाते. लोकांची फसवणूक करण्यासाठी चोरांकडून गूगलवर एक मोबाईल क्रमांक टाकला जातो. जर कोणी या नंबरवर फोन केला तर, त्यांची फसवणूक करुन त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जाते.

केव्हाईसी अपडेट-

बँकेसह पेटीएम केव्हायसी अपडेटच्या नावावरही लोकांची फसवणूक केली जाते. फोन, मॅसेज, ईमेलच्या माध्यमातून अनेकांची लूट झाल्याची माहिती आपल्या समोर आली आहे. एखाद्याची फसवणूक करण्यासाठी काही चोरटे बॅंकेतून फोन केल्याचे भासवतात आणि आपली सर्व गोपनीय माहिती मिळवतात. त्यानंतर संबधित खातेदाराच्या खात्यातून पैसे काढून घेतले जातात. काही प्रकरणात संबधित व्यक्तीच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली जाते. ज्या लिंकवर क्लिक करताच आपली सगळी माहिती समोरच्या व्यक्तीला कळते. ज्याच्या माध्यमातून आपली लूट केली जाते.

OLX / Quikr घोटाळा-

जेव्हा ओएलएक्सवर किंवार क्विकरवर जुन्या वस्तूंची खरेदी किंवा विक्री केली करतो. दरम्यान, काहीवेळा त्याठिकाणी तोतया एक्झिक्यूटिव्ह असतो. सुरुवातीला आपला विश्वास जिंकून वस्तूंची खरेदी किंवा विक्रीच्या माध्यमातून रक्कम वसूल करता है. ज्यावेळी संबधित व्यक्तीला याची माहिती होते, तो पर्यंत तोतया एक्झिक्यूटिव्ह तुमच्या खात्यावरुन सर्व रक्कम ट्रान्सफर करुन घेतात.

गेल्या वर्षात अनेक फसवणुकीच्या घटना आपल्या समोर आल्या होत्या. धक्कादायक म्हणजे, काही लोक बदनामीच्या होईल, या भितीने पोलिसांत तक्रार करायला घाबरतात. याप्रकरणी पोलिसांकडून वारंवार सावध राहण्याचे आवाहन दिले जातात.