कंप्युटरचा Keyboard इंग्रजी बाराखडीनुसार का सेट केला जात नाही? जाणून घ्या कारण
कंम्प्यूटवर टायपिंग करण्याचा प्रयत्न करणार्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की किबोर्ड च्या कीज सरळ वाचता येईल अशा अल्फाबेटिकली (abcd)ऑर्डरने का दिला जात नाही?
कंम्प्यूटवर टायपिंग करण्याचा प्रयत्न करणार्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की किबोर्ड च्या कीज सरळ वाचता येईल अशा अल्फाबेटिकली (abcd)ऑर्डरने का दिला जात नाही? आता स्मार्टफोनवरही दिसणारा टचस्क्रीन किबोर्डही तसाच क्वर्टी (Querty) प्रकारचा असतो. याचे उत्तर आपण कधी ना कधी कोणाला तरी विचारलेले असते मात्र ते बहुतेकवेळा मिळत नाही. तर यासाठी 19 व्या शतकात जावे लागेल.ज्यावेळी चार्ल्स बेबेज नावाच्या गणित तज्ञाने सर्वप्रथम प्राथमिक स्वरुपातील कॉम्प्युटरचा शोध लावला. त्यामुळे बेबेजला कॉम्प्युटरचा पिता असेही संबोधण्यात येते.
बेबेजच्या कॉम्प्युटरनंतर आतापर्यंत कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये फार मोठे बदल झाले आहेत. परंतु एक गोष्ट अजिबात बदलली नाही ती म्हणजे कॉम्प्यूटरचा क्वर्टी किबोर्ड. बेबेज जेव्हा कॉम्प्युटरच्या किबोर्डच्या बटणांचा क्रम निश्चित करीत होते. तेव्हा त्यांना आढळून आले की कीज त्या काळातील टाईपराईटर मशिनप्रमाणे अल्बाबेटिकली क्रमात सेट केल्या तर त्या जाम तर होत होत्याच याशिवाय abcd क्रमाने त्या वेगवेगळ्या स्पेलिंगसाठी दाबतानाही अडचणी येत होत्या.(Google Maps ला स्वदेशी पर्याय MapmyIndia; भारतीय बनावटीच्या मॅपिंग सर्व्हिससाठी ISRO सोबत करार)
टाईपरायटरमध्ये बॅकस्पेस बटण नसल्यामुळे टायपिंग करताना काही चूक झाल्यास ती दुरुस्त करुन पुन्हा टाईपही करता येत नव्हते. त्यामुळे कॉम्प्यूटरसाठी abcd अल्फोबेटिक किबोर्ड वापरुन चालणार नाही हे बेबेजच्या लक्षात आले. बेबेजने खूप अभ्यास केल्यानंतर सुलभ टायपिंगसाठी क्वर्टी (Querty) कीबोर्डचा शोध लावला. या बटणांचा वापर प्रत्येकाला करता येत होता आणि दोन्ही हातांच्या बोटांचा वापर करुन जलद गतीने टायपिंगही करता येत होते. पुढे टाईपरायटरमध्येही क्वर्टी किबोर्ड वापरला जाउ लागला.
सुरुवातीचे कॉम्प्युटर आणि आजचे कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीम, स्पीड, वापराचे विभाग यामध्ये प्रचंड तफावत असले तरी querty किबोर्ड मात्र कायम आहे. सध्या स्मार्टफोनवरील व्हाईस टायपिंगच्या जमान्यातही क्वर्टी कीपॅडचे महत्व अजिबात कमी झालेले नाही.
(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2021 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

