व्हॉट्सअॅप सध्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग पडला आहे. प्रत्येक वयोगातील व्यक्ती व्हॉट्सअॅपशी जोडला गेला आहे. तसेच वर्क फ्रॉम होमच्या काळात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ऑफिसच्या मिटिंग्स होण्यासह लहान मुलांचा अभ्यास सुद्धा केला जात आहे. ऐवढ्या सगळ्या वापरामुळे व्हॉट्सअॅप डेटा लवकरच संपतो. अशातच युजर्सला महागडा डेटाचा रिचार्ज पॅक करावा लागतो. मात्र अशा काही ट्रिक्स आहेत ज्या वापरुन तुम्ही व्हॉट्सअॅप तुम्हाला हवे तसे आणि किती ही वेळ वापरु शकता. त्यामुळे तुमचा डेटा अधिक खर्चिक होणार नाही याची सुद्धा चिंता दूर होईल.(WhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल?)
व्हॉट्सअॅपचा अधिक वापरामुळे डेटा अधिक खर्चिक होतो. मात्र काही वेळेस आपण व्हॉट्सअॅपचा फक्त कामासाठी वापर केल्यास डेटा संपण्याची चिंता नसते. बहुतांश लोक Whatspp चा विनाकारण वापर केल्याने नको असलेले फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाऊनलोड होतात. अशावेळी तुम्ही व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन 2-3 बदल करावे लागणार आहेत.(एकाच मोबाईलवर दोन WhatsApp अकाउंट कसे वापराल? जाणून घ्या 'या' सोप्प्या ट्रिक्स)
युजर्सला सर्वात प्रथम Auto Download Save चे ऑप्शन बंद करावे लागणार आहे. यामुळे तुमच्या व्हॉट्सअॅपवर येणारा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ डाऊनलोड होणार नाही आहे. युजर्सला जे फोटो आणि व्हिडिओ डाऊनलोड करायचे आहेत त्यावर क्लिक करावे. असे केल्यास तुमचा डेटा सुद्धा वाचेल आणि नको असलेले फोटो किंव व्हिडिओ उगाचच डाऊनलोड होण्यासह फोनची मेमोरी सुद्धा Full होणार नाही.
>>>काय करावे?
>>WhatsApp युजर्सला सर्वात प्रथम Setting ऑप्शनमध्ये जावे लागणार आहे. तेथे Data and Storage Usages वर क्लिक करावे.
>>येथे युजर्सला मीडिया ऑटो डाऊनलोड दिसेल, त्यात फोटो, व्हिडिओ आणि व्हिडिओसह डॉक्युमेंट्स असे ऑप्शन ही दिसतील.
>>यावर क्लिक केल्यास तीन ऑप्शन दिसतील. पहिले Never, दुसरे Wifi आणि तिसरे Wifi आणि सेक्युलर.
>>जर तुम्ही Wifi वर क्लिक केल्यास मीडिया फाइल तेव्हाच Save होतील जेव्हा तुमचा फोन Wifi सोबत कनेक्टेड असेल. या पद्धतीने तुमच्या फोटोचा डेटा वाचेल. तसेच Never ऑप्शनवर क्लिक केल्यास फोनसह तुमच्या घरातील असलेल्या Wifi चा डेटा सुद्धा कमी वापरला जाईल.
तसेच व्हॉट्सअॅप युजर्सला कारणाशिवाय आलेले मेसेच किंवा चॅट मुळे फोनची मेमोरी पूर्ण भरण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही चॅटसाठी ऑटो सेव्ह ऑप्शन बंद करावे लागणार आहे. अशीच पद्धत तुम्ही व्हॉट्सअॅप कॉलिंगच्या वेळी सुद्धा वापरु शकता. पण सेटिंग्समध्ये जाऊन या संबंधित बदल केल्यास ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची क्वालिटी थोडी खराब होऊ शकते.