WhatsApp (PC- Pixabay)

सरत्या वर्षामध्ये म्हणजेच 2023 मध्ये नोंदवलेल्या ऑनलाइन घोटाळ्यांच्या तक्रारींना WhatsApp ने तत्काळ प्रतिसाद दिला आहे. ज्यामध्ये अवघ्या एका महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2023 मध्ये तब्बल 71 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. नवीन IT नियम 2021 चे पालन करत ही कारवाई करण्या आली. मेसेजिंग प्लॅटफॉर्मची वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आणि गैरवापराचा सामना करण्यासाठी व्हॉट्सअॅपने हे पाऊल उचलले.

वृत्तसंस्था IANS ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात 500 दशलक्ष पेक्षा जास्त वापरकर्ते असलेल्या WhatsApp ने 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान 19,54,000 खात्यांवर सक्रियपणे बंदी घातली आहे. कंपनीच्या मासिक अनुपालन अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे की, त्यांनी नोव्हेंबरमध्ये 8,841 तक्रार अहवाल हाताळले आहेत. ज्यामध्ये बंदी किंवा पुनर्स्थापना यासह अनेक खात्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. (हेही वाचा, व्हॉट्सअॅपकडून एकाच महिन्यात 71 लाखांहून अधिक खाती बंद)

तक्रार अपील समिती (GAC)

व्हॉट्सअॅपचा वापरकर्ता-सुरक्षा रिपोर्ट वापरकर्त्याच्या तक्रारी, संबंधित कृती आणि गैरवापराच्या विरोधात प्रतिबंधात्मक उपायांचा अभ्यास करतो. प्लॅटफॉर्मने तक्रार अपील समिती (GAC) सादर करून आपल्या वचनबद्धतेवर जोर दिला आहे. तसेच, भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेचे निराकरण करणे हा आपला उद्देश असल्याचे म्हटले आहे.

Android वापरकर्त्यांसाठी धोरणात्मक बदल:

संबंधित विकासामध्ये, Android वरील WhatsApp वापरकर्ते एक महत्त्वपूर्ण बदल अनुभवणार आहेत. ज्यामध्ये त्यांना चॅट बॅकअप यापुढे विनामूल्य राहणार नाहीत. व्हॉट्सअॅपने जाहीर केले की, या वर्षापासून, चॅट बॅकअप वापरकर्त्यांच्या Google ड्राइव्ह स्टोरेज मर्यादेत असतील. जे मोफत 15GB कोट्यावर अवलंबून असलेल्यांवर परिणाम करेल. Android वापरकर्त्यांना आता Google One सह WhatsApp द्वारे अतिरिक्त स्टोरेजमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा लागेल.

WhatsApp हे एक विनामूल्य, क्रॉस-प्लॅटफॉर्म मेसेजिंग अॅप आहे. जे वापरकर्त्यांना मजकूर संदेश, व्हॉइस संदेश, व्हिडिओ संदेश आणि प्रतिमा, दस्तऐवज आणि वापरकर्ता स्थाने सामायिक करण्यास अनुमती देते. WhatsApp iPhone, Android, Mac आणि Windows PC वर उपलब्ध आहे. व्हॅट्सअॅपची काही महत्त्वाची फीचर्स आहेत. ज्यामध्ये पुढील फीचर्सचा समावेश आहे. जसे की, एंड-टू-एंड एन्क्रिप्शन: टेक्स्टिंग आणि इतर मेसेजिंग अॅप्सपेक्षा WhatsApp अधिक सुरक्षित आहे. वाय-फाय कनेक्शन: व्हॉट्सअॅपचा वापर डेटा कनेक्शनशिवाय केला जाऊ शकतो, कारण वाय-फायवरून कॉल आणि मजकूर पाठवले जाऊ शकतात. वापरकर्ते त्यांच्या संपर्कांसह तात्पुरते फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतात. वापरकर्ते इतर वापरकर्त्यांना एकमेकात किंवा गटांमध्ये संदेश पाठवू शकतात. स्थान माहिती: वापरकर्ते त्यांची स्थान माहिती शेअर करू शकतात.