नव्या वर्षात व्हॉट्सअॅपचे (WhatsApp) नवीन फिचर (New Feature) हे युजर्संना वापरायला मिळणार आहे. सध्या काही फिचर्सची टेस्टिंग सुरु आहे. याबद्दल WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपचे नव्या वर्षात युजर्सना नवीन फिचर्स वापरायला मिळणार आहेत. गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही नवीन फिचर्स लाँच होणार आहेत. या फिचर्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या हँडलला आवडीचं नाव देऊ शकता. (हेही वाचा - Instagram New Features: इन्स्टाग्राम युजर्सना मिळणार खास फिचर, स्टोरीवर प्रोफाइल शेअर करण्याचा मिळणार पर्याय)
व्हॉट्सअॅपच्या माहितीनुसार, तुम्ही व्हिडिओ कॉलदरम्यान म्यूझिक ऑडिओ देखील शेअर करू शकता. त्यात स्क्रिन शेअरींगचं नवं फिचर देखील असणार आहे. या फिचर्समुळे युजर्स चॅटबॉटच्या मदतीने चॅटिंग करता येणं शक्य होणार आहे. या अॅपबद्दल अधिक माहिती हाती आलेली नाही. या फिचर्सच्या मदतीने युजर्सला 'कस्टमर सपोर्ट' मिळणार आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप २०२४ मध्ये नवीन फिचर्स भेटीला येणार आहे. यात ग्रुप पॉल्स, सर्च ऑप्शन, ग्रुप इव्हेंट शेड्युल करता येणं शक्य होणार आहे. मात्र, हे फिचर्स केव्हा लाँच होणार,याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.