Instagram New Features: इन्स्टाग्राम युजर्सना मिळणार खास फिचर, स्टोरीवर प्रोफाइल शेअर करण्याचा मिळणार पर्याय
Instagram (PC - pixabay)

सध्या तरुणांमध्ये इन्साग्रामच्या (Instagram) रील्स (Reels) आणि स्टोरीजची (Story) क्रेझ असून या ॲपची मदत घेऊन अनेक छोटे व्यवसाय आणि तर इन्फ्लुएन्सरदेखील त्यांचे कन्टेन्ट पोस्ट करत असतात. इन्स्टाग्राम आता सगळ्यांसाठी लवकरच एक खास फिचर घेऊन येणार आहे. लोकप्रिय ऑडिओ आणि व्हिडीओ शेअरिंग इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म एका नवीन फिचरवर काम करत आहे, जे वापरकर्त्यांना इतर लोकांची प्रोफाइल स्टोरी म्हणून पोस्ट करण्यास परवानगी देईल.  (हेही वाचा - New Rule For Social Media: वापरा नाहीतर विसरा! सरकारने 'फेसबूक' आणि 'इंस्टाग्राम'बाबत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; कारणही घ्या जाणून)

सध्या ॲपमध्ये स्टोरी शेअरचा पर्याय आहे. पण, तो क्यूआर कोडच्या स्वरूपात येतो; ज्यामुळे युजर्सना त्रास होतो. तर नवीन फिचर आल्यानंतर तुम्ही तुमचे प्रोफाइल शेअर करू शकाल आणि इतर युजर्स थेट तुमच्या प्रोफाइलवर टॅप करून तुमच्यापर्यंत पोहचू शकणार आहेत. नवीन फिचरमुळे इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या क्रिएटरचा प्रोफाइल स्टोरीवर पोस्ट करता येईल.

हा फिचर नव्याने व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास ठरेल. म्हणजेच मेहेंदी आर्टिस्ट, दागिने किंवा विविध टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणाऱ्या अनेक तरुण मंडळींसाठीही त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची कला पोहचेल.