व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे स्मार्टफोनद्वारे वापरले जाणारे सर्वात प्रसीद्ध अॅप. समाजमाध्यमातील सर्वाधिक चर्चित आणि प्रसिद्ध मंच असेही म्हणता येईल. तर, असे हे प्रसिद्ध व्हॉट्सअॅप एका नवीन अपडेटवर काम करत आहे. जे वापरकर्त्यांना फॉरवर्ड केलेल्या मीडियामध्ये संदेश, स्पष्टीकरण अथवा टिप्पणी जोडण्याची परवानगी (WhatsApp Description to Forwarded Media) देईल. होय, जसे की आपण ट्विटरवर एखादे ट्विट रिट्विट करताना आपला विचारही सोबत जोडून पोस्ट करतो. साधारण तसेच हे फिचर असावे असे सांगितले जात आहे.
लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग सेवा WhatsApp मेटाच्या मालकीची आहे. WhatsApp नुकतेच आपले बीटा व्हर्जन (अवृत्ती) आणली आहे. जी Google Play द्वारेही स्वीकारण्यात आली आहे. बीटा अवृत्ती नव्या अपडेटसह, अग्रेषित केलेल्या प्रतिमा, व्हिडिओ, GIF आणि दस्तऐवजांमध्ये माहिती जोडण्यास आधीच सक्षम आहे.
व्हॉट्सअॅपची अपडेटचे बीटा वर्जन वापरुन वापरकर्ते आता फॉरवर्ड केलेल्या प्रतिमांसह येणारे संदेशाचे मथळे काढून टाकू शकतात. तसेच वैयक्तिक वर्णन जोडू शकतात. हे नवीन वैशिष्ट्य वापरकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या संदेशासह एक स्वतंत्र संदेश पाठविण्यास अनुमती देते. जेणेकरुन संदेश प्राप्तकर्त्यांना हे समजण्यास मदत होईल की तो मूळ संदेशाशी संबंधित नाही. (हेही वाचा, WhatsApp New Feature: आता व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडिओ एडिट करता येणार; 'या' नवीन फीचरमुळे तुमचं काम होणार सोपं)
दरम्यान, व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर अद्याप वापरकर्त्यांसाठी पूर्ण खुले झाले नाही. त्यावर सध्या काम सरु आहे. पण जेव्हा केव्हा हे फिचर वापरकर्त्यांच्या भेटीला येईल तेव्हा, हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांसाठी फॉरवर्ड केलेल्या मीडियामध्ये संदर्भ आणि तपशील जोडण्याचा एक मार्ग प्रदान करेल. ज्यामुळे प्राप्तकर्त्यांना संदेश आणि तो पाठविणाऱ्यासोबतच फॉर्वर्ड करणाऱ्याचे स्वतंत्र विचारही जाणून घेता येतील.
WhatsApp हे एक मेसेजिंग अॅप आहे. जे वापरकर्त्यांना मजकूर संदेश, व्हॉइस संदेश, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल, फोटो आणि व्हिडिओ यांसारख्या मीडिया फाइल्स शेअर करण्यास आणि पेमेंट देखील करण्यास अनुमती देते. या अॅप 2009 मध्ये ब्रायन ऍक्टन आणि जॅन कौम यांनी तयार केले होते. फेसबुकने नंतर ते 2014 मध्ये विकत घेतले. WhatsApp iOS, Android, Windows आणि macOS सह विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. जगभरात त्याचे 2 अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. हे वापरकर्त्याचे संप्रेषण सुरक्षित करण्यासाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरते, याचा अर्थ संदेश आणि कॉल केवळ प्रेषक आणि प्राप्तकर्त्याद्वारे प्रवेश करण्यायोग्य आहेत. व्हॉट्सअॅपची विविध फीचर्स आहेत. त्याची वैशिष्ट्ये अशी की ग्रुप चॅट, स्टेटस अपडेट्स आणि आवडीवर आधारित समुदाय तयार करण्याची आणि त्यात सामील होण्याची संधी देखील उपलब्ध करुन देते. अॅप वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही वापरासाठी एक लोकप्रिय संप्रेषण साधन बनले आहे.