व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी आणले 'हे' खास फीचर्स; जाणून घ्या
WhatsApp (Photo Credits: WhatsApp)

संपूर्ण जगात चॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेला व्हॉट्सअप अॅप (WhatsApp) नेहमी आपल्या युजर्ससाठी नव-नवीन फीचर लाँच करत असते. जगभरात व्हॉट्सअॅपचे 1.5 बिलियन आणि भारतात 400 मिलियन युजर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्स अॅपने युजर्ससाठी काही महत्त्वाची फीचर्स विकसीत केली आहेत.

येत्या काळात व्हॉट्सअॅप युजर्सना अ‍ॅपवर आणखी काही महत्त्वाचे फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यातील काही फीचर्स व्हॉट्सअॅपच्या अपडेटेड व्हर्जनवर उपलब्ध असणार आहेत. याचा फीचर्सचा लाभ घेण्यासाठी युजर्सना आपले व्हॉट्स अॅप अपडेट करावे लागणार आहे. (हेही वाचा - Whats App च्या माध्यमातून हॅकर्स करतायत अटॅक, 'या' फाइल्स कधीच डाऊनलोड करु नका)

Multiple Device Support -

आता तुम्हाला एकाच वेळी अनेक डिव्हाइसमध्ये व्हॉट्स अ‍ॅप अकाऊंट सुरू करता येणार आहे. सध्या व्हॉट्स अ‍ॅप हे एकावेळी केवळ फोनमध्येच वापरता येते. यासाठी कंपनीने 'व्हॉट्स अ‍ॅप वेब'चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ही पद्धत वापरून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये व्हॉट्स अ‍ॅप सुरू करू शकता. परंतु, त्यासाठी तुमचा मोबाइल कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या जवळ असणे गरजेचे आहे. मात्र आता व्हॉट्स अॅप एकाच वेळी ते विविध डिव्हाइसमधून लॉग इन करता येणार आहे.

हेही वाचा - गुगलचा Pixel स्मार्टफोन हॅक करणाऱ्याला गुगल देणार 10 कोटी!

Dark Mode -

व्हॉट्स अॅप आपल्या युजर्ससाठी खास डार्क मोड फीचर आणणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या फीचर्सची चर्चा आहे. या फीचरचा युजर्सना मोठा फायदा होणार आहे. या फीचरमुळे युजर्सना डोळ्यांना होणारा त्रास कमी होणार आहे. संध्याकाळी मोबाईलमधील ब्राइट लाइटमुळे डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे व्हॉट्स अॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी 'डार्क मोड' हे फीचर आणणार आहे.

Netflix streaming support -

व्हॉट्स अॅप युजर्ससाठी आणखी एक खुशखबर म्हणजे आता व्हॉट्स अॅपवर बोलत असताना युजर्सना नेटफ्लिक्सवर व्हिडिओही पाहता येणार आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर चॅट करत असताना Picture in picture mode द्वारे नेटफ्लिक्सवरचे व्हिडिओदेखील सुरू राहणार आहे. व्हॉट्स अॅपच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये हे फीचर सुरू झाले आहे.

व्हॉट्स अॅपने आपल्या युजर्ससाठी फिंगरप्रिंट लॉक फीचर आणले आहे. सध्या हे अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे फीचर व्हॉट्स अॅपच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. फिंगरप्रिंट हे फीचर युजर्स फिंगरप्रिंटच्या माध्यमातून लॉक-अनलॉक करु शकतात.