गुगलचा Pixel स्मार्टफोन हॅक करणाऱ्याला गुगल देणार 10 कोटी!
google (PC - File Photo)

गुगलने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. गुगलचा Pixel स्मार्टफोन हॅक करणाऱ्याला गुगल तब्बल 1.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 10 कोटी 76 लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे. गुगलने एका पोस्टद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. गुगलने Pixel स्मार्टफोनमध्ये Titan M चीप बसवली आहे. ही चीप अत्यंत सुरक्षित असल्याचं गुगलने सांगितलं आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन हॅक करून दाखवल्यास गुगल त्या व्यक्तीला 10 कोटी रुपये देणार आहे. (हेही वाचा - Facebook आणि Twitter ला टक्कर द्यायला विकिपीडियाचा नवा उपक्रम- WT:Social)

या स्मार्टफोनमध्ये 'टायटन M' हे सुरक्षा पुरवण्याचे काम करणार आहे. यामुळे स्मार्टफोनमध्ये याला सर्वात जास्त रेटिंग देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमधील उणीवा शोधण्यासाठी गुगलने ही खास ऑफर जाहीर केली आहे. तसेच गुगलने अँड्रॉईड व्हर्जन हॅक करणाऱ्यांनाही बक्षीस जाहीर केलं आहे. यातही काही कमतरता शोधल्यास 50 टक्के रक्कम बोनस म्हणून दिली जाणार आहे. गुगलने 2015 मध्ये अँड्रॉईड स्मार्टफोन 'बग बाउंटी प्रोग्राम'ची सुरूवात केली होती. विशेष म्हणजे गुगलने आतापर्यंत 1800 रिपोर्ट्सला बक्षीस दिले आहे. तसेच गुगलने गेल्या 12 महिन्यात गुगलच्या सिस्टममध्ये कमी शोधणाऱ्यास बक्षीस म्हणून 1.5 मिलियन डॉलर दिले आहेत.

हेही वाचा - Google Search करताना चुकून सुद्धा 'या' गोष्टीबाबत ऑनलाईन माहिती मिळवू नका, नुकसान होईल

गुगल संशोधकांनी ही खास ऑफर आपल्या कमतरता शोधण्यासाठी जाहीर केली आहे. गुगल आपल्या स्मार्टफोनला अधिक सुरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे. गुगलने यापूर्वी अनेकदा अशा ऑफर्स लाँच केल्या आहेत. तसेच अनेकांनी गुगलच्या कमतरता दाखवून कोट्यावधी रुपयांचे बक्षीस मिळवली आहेत.