Google Search करताना चुकून सुद्धा 'या' गोष्टीबाबत ऑनलाईन माहिती मिळवू नका, नुकसान होईल
Google Chrome Browser (Photo Credits-Twitter)

सध्या काही गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्चचा (Google Search) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तर सध्या ऑनलाईन पद्धतीने अवघ्या काही मिनिटात माहिती उपलब्ध होत असल्याने पुस्तकी ज्ञान कमी होताना दिसून येत आहे. भारतात 70 करोड इंटरनेट युजर्स असून सर्वाधिक प्रमाणात गुगल सर्चचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, गुगलवर काही गोष्टी सर्च केल्यास त्यामुळे युजर्सला नुकसान करावे लागते. गुगलवर सर्च करण्याचे फायदे अनेक आहेतच. पण त्याचे काही तोटे सुद्धा आहेत. त्यामुळे गुगलवर एखाद्या गोष्टीची माहिती ऑनलाईन सर्च करताना जरा सावध राहिलेले बरे. कारण 'या' काही गोष्टींबाबत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सर्च केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता फार अधिक असते.

-कंपन्यांचे कस्टमअर केअर क्रमांक

गेल्या काही काळापासून कस्टमअर केअर क्रमांकावर फोन केल्यास युजर्सला एखाद्या गोष्टीबाबत काही मिनिटात माहिती दिली जाते. तसेच कोणत्याही पद्धतीचा अडथळा येत असल्यास आपण कस्टमअर केअरला फोन करतो. परंतु काही कंपन्यांच्या कस्टमअर केअरच्या क्रमांकाबाबत आपल्याला अधिक माहिती नसल्याने आपण गुगल सर्चवरुन तो शोधून काढतो. मात्र गुगल सर्च वरुन असे क्रमांक शोधून काढणे काही वेळेस धोकादायक ठरु शकते.कारण काही हॅकर्स सायबर हल्ला करत खोटे कस्टमअर केअर क्रमांक देऊन युजर्सची फसवणूक करतात. यामध्ये सध्या SIM Swap सारखे प्रकार सर्वाधिक होतात.

-ऑनलाईन बॅकिंग सर्विस

आजकाल डिजिटल पद्धतीच्या व्यवहाराला चालना देण्यासाठी नवे नवे उपक्रम राबवले जात आहेत. त्यात आता बँकेने सुद्धा ग्राहाकांना ऑनलाईन पद्धतीने त्याचे कामकाज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र गुगल सर्च वरुन जर तुम्ही एखाद्या बँकेचा कस्टमअर केअर सर्च केल्यास तेथे काही क्रमांक दिसून येतील. अशावेळी हकर्स सुद्धा खोटी URL दाखवून तुमची फसवणूक करु शकतात. त्यामुळे बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन तु्म्ही बँक संदर्भातील तुमचे व्यवहार पूर्ण करु शकता.(Whats App च्या माध्यमातून हॅकर्स करतायत अटॅक, 'या' फाइल्स कधीच डाऊनलोड करु नका)

- मेडिल प्रिसक्रिप्शन

जेव्हा आपल्याला थोडे जरी आजारी असल्याचे वाटते त्यावेळी आपण काही वेळेस डॉक्टरकडे न जाता ऑनलाईन पद्धतीने औषधाबाबत सर्च करतो. परंतु ही गोष्ट आपल्या आरोग्यासाठी खुप हानिकारक ठरु शकते. कारण गुगलवर एखाद्या आजाराचे योग्य निवारण करण्यासाठी नेहमीच खरी माहिती मिळेल याची शक्यता फार कमी असते.

त्याचसोबत सध्या हॅकर्सकडून युजर्सच्या स्मार्टफोनमधील पर्सनल डेटा हॅक केला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे युजर्सला सावधान राहण्यास सांगण्यात येते. एवढेच नाही तर शासकीय संकेस्थळाबाबत सुद्धा तुमची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.