काही सेकंदात अवघ्या जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीला मेसेज पाठवता येईल यासाठी ट्रेन्डिंग असलेले व्हॉट्सअॅपच्या युजर्सची संख्या लाखो-करोडोच्या घरात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर हॅकर्स कडून हॅकिंग केल्याचे प्रकार समोर येत असल्याने युजर्सच्या प्रायव्हसीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यात पुन्हा एक भर पडली असून एका युजर्सला MP4 व्हिडिओ फाइल पाठवून मेलवेअर अटॅक करण्यात आला आहे. यामुळे तुमचा स्मार्टफोन निकामी होण्यासोबत तुमचा पर्सनल डेटा सुद्धा लीक होऊ शकतो. भारतीय कप्युटर इमरजेन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) यांनी हॅकर्सकडून करण्यात येणाऱ्या सायबर हल्ल्याला सिवरिटीमध्ये कॅटगराइज्ड केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी इज्राइलची स्पायवेअर निर्माती कंपनी NSO ग्रुपने देशातील 1400 पेक्षा अधिक व्हॉट्सअप अकाउंट हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामुळे जगभरातील युजर्स असून त्यात मुख्यत्वे हाय प्रोफाइल नेतेमंडळी, पत्रकार यांचा समावेश होता. व्हॉट्सअॅपची पॅरेंट कंपनी फेसबुक यांनी असे सांगितले आहे की, अज्ञात क्रमांकावरुन MP4 फाइल पाठवल्या जात आहेत. यामुळे ही फाइल डाऊनलोड केल्यास युजर्सचा फोन हॅक होण्याची शक्यता अधिक आहे.(हेल्पलाईनच्या नावाखाली येणाऱ्या फोनबाबत सावधान, मिनिटांमध्ये खाली होईल बँक खाते)
सीईआरटी यांनी या व्हायरसचे CVE-2019-11931 या नाव असल्याचे सांगितले आहे. हा व्हायरस सर्व ऑरेटिंग सिस्टिम iOS, Android आणि Windows स्मार्टफोनला प्रभावित करु शकतो. मात्र व्हॉट्सच्या नव्या सिक्युरिटी मुळे या प्रकारचा सायबर हल्ला होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा व्हॉट्सअॅपचे नवे अपडेट डाऊनलोड करु घ्या.