फोटो सौजन्य- PTI

सोशल मीडियाच्या जगात फेसबुक (Facebook) आणि ट्विटर (Twitter) नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. अनेक ऍप्सनी यांच्याशी स्पर्धा करायचा प्रयत्न केला. परंतु, या ऍप्सची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी एक नवं ऍप लवकरच टेक्नो- जगात येणार आहे.

'डब्लूटी: सोशल' (WT:Social) नुकतेच सुरु करण्यात आले आहे. जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या विकिपीडिया (WikiPedia) या मुक्त ऑनलाईन माहिती कोषाच्या संस्थापकांकडून WT:Social सुरु करण्यात आले आहे.

या नव्या सोशल नेटवर्किंग साईटचे वैशिष्ट्य म्हणजे ट्विटर आणि फेसबुकप्रमाणे ही साईट ऍड्सच्या माध्यमातून पैसे मिळवणार नाही तर विकिपीडियाप्रमाणेच हे देखील निधी गोळा करून खर्च चालवणार आहे.

विकिपीडियाचे सह-संस्थापक असणाऱ्या जिमी वेल्स यांनी WT:Social बद्दल बोलताना काबुल केले आहे की, "आमची थेट स्पर्धा फेसबुकशी असणार आहे. युझर्स WT:Social वर त्यांचे विचार व्यक्त करू शकतील. सध्या सोशल मीडियावर नको तो मजकूर मोठ्या प्रमाणात दिला जातो, ज्याचा युझर्सना काही फायदा होत नाही तर त्याने फक्त कंपन्यांचेच खिसे भरले जातात."

Google Search करताना चुकून सुद्धा 'या' गोष्टीबाबत ऑनलाईन माहिती मिळवू नका, नुकसान होईल

महत्त्वाचे म्हणजे WT:Social वर लॉगइन मोफत असले तरी तुमचे अकाऊंट ऍक्टिव्ह होण्यासाठी तुम्हाला काही काळ वाट पहावी लागणार आहे. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य बसेल की आतापर्यंत या नव्या सोशल मीडिया वेबसाईटवर दोन लाखाहून अधिक युझर्सनी अकाऊंट बनवले देखील आहे.