Elon Musk: एलोन मस्क (Elon Musk) आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता नुकतेच त्यांनी मेटाला आव्हान दिले असून त्यानंतर वातावरण तापले आहे. त्याचबरोबर आता त्यांनी विकिपीडिया (Wikipedia) संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. जर विकिपीडियाने नाव बदलले तर ते एक अब्ज डॉलर्स देतील असे त्यांनी सांगितले. अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटर खरेदी केले होते. तेव्हापासून ते ट्विटरवर नवनवीन बदल करत आहे. काही महिन्यांपूर्वी ट्विटरचे नाव बदलून X असे करण्यात आले होते. आता याच दरम्यान त्यांनी विकिपीडियालाही आव्हान दिले आहे.
एलोन मस्क यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'विकिपीडियाने त्याचे नाव बदलले तर मी त्याला एक अब्ज डॉलर देईन.' यावर युजरने विकिपीडियाचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की, पैसे मिळताच तुम्ही तुमचे नाव बदलून घ्या. यावर मस्क यांनी एक अट घातली. ते म्हणाले, मी वेडा नाही. विकिपीडियाला किमान वर्षभर नाव बदलणे आवश्यक आहे. (हेही वाचा - X Won't Be Free Anymore: इलॉन मस्क आता प्रत्येक नवीन वापरकर्त्यांकडून एक डॉलर शुल्क आकारण्याची शक्यता, अहवालातून खुलासा)
I will give them a billion dollars if they change their name to Dickipedia https://t.co/wxoHQdRICy
— Elon Musk (@elonmusk) October 22, 2023
टेस्ला सीईओने आणखी एक पोस्ट केली. त्यात त्यांनी विकिपीडियाच्या होमपेजचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये जिमी वेल्सचे आवाहन आहे की विकिपीडिया विक्रीसाठी नाही. मस्क म्हणाले, 'विकिमीडिया फाऊंडेशनला इतके पैसे का हवे आहेत, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? विकिपीडियाला चालवण्यासाठी हे नक्कीच आवश्यक नाही. डोकं असलेल्या लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की तुम्ही तुमच्या फोनने अक्षरशः काहीही टाइप करू शकता! मग तुला पैशाची गरज काय?'
(Please add that to the 🐄💩 on my wiki page)
— Elon Musk (@elonmusk) October 22, 2023
मस्कने एका पोस्टमध्ये प्रश्न विचारला आहे की, त्याच्या विकिपीडिया पृष्ठावर एक गाय आणि एक पू इमोजी जोडली जाऊ शकते का? एलोन मस्क यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक यूजर्स त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.