व्हॉट्सअॅपने (WhatsApp) मागील महिन्याभरात तब्बल 20 लाख भारतीय अकाऊंट्स रद्द केले आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या आयटी नियमांनुसार (New IT Rules) हा निर्णय घेण्यात आला आहे. यांसदर्भातील पहिला मासिक अहवाल व्हॉट्सअॅपने आज सादर केला. यात 15 मे ते 15 जून दरम्यान तब्बल 20 लाख अकाऊंट्स बॅन केल्याचे म्हटले आहे. या अकाऊंट्सवरुन गरज नसलेले किंवा हानिकारक मेसेजेस मोठ्या प्रमाणावर पाठवण्यात येत होते.
ऑटोमेडेट किंवा ब्लक मेसेजिंगचा वापर केल्यामुळे यातील 95 टक्के अकाऊंट्स बॅन करण्यात आल्याचे कंपनीने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. भारताच्या इंटरमिडिएटरी गाईडलाईन्स 2021 नुसार वेगवेगळ्या ग्रिव्हीयन्स चॅनल्सकडून मिळालेल्या डेटाची पडताळणी केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात आल्याचे कंपनीने या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
हानिकारक आणि गरज नसलेले मेसेज मोठ्या प्रमाणात पाठवणाऱ्या अकाऊंट्सला आळा घालणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. अशा अकाऊंट्समधून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मेसेजिंगच्या गैरवापराची पाहाणी करण्यासाठी आम्ही अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करत असल्याचेही कंपनीने सांगितले.
आम्हाला संपर्क करणारे बहुतांश युजर्स अशा प्रकारचा बॅन हटवण्याची मागणी करत असतात. एखाद्या प्रॉडक्ट्साठी किंवा अकाऊंट सपोर्टसाठी देखील काही युजर्स आमच्याकडे चौकशी करतात. गेल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट स्थगित करणार असल्याचे दिल्ली हायकोर्टाला सांगितले. डेटा प्रोटेक्शन बिल जो पर्यंत येत नाही तोपर्यंत ही स्थगित कायम राहणार आहे. (WhatsApp चं नवं फिचर; लवकरच देणार Video Quality निवडण्याचा पर्याय)
"कायदा सर्वात मोठा असून त्याला कोणीही अनादर करु शकत नाही", असे नुकत्याच पदभार स्वीकारलेल्या आयटी मंत्री आश्विनी वैष्णव यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. तर "आम्हाला या कायद्यामध्ये सामावून घेणे गरजेचे आहे," असे व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे. दरम्यान, गुगल, फेसबुक आणि ट्विटर यांनी त्यांचे मासिक रिपोर्ट्स यापूर्वीच सादर केले आहेत.