WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार युजर्स बुचकळ्यात पडले आहेत. सायबर मीडिया रिसर्चच्या एका सर्वे नुसार 28 टक्के युजर्सकडून आता व्हॉट्सअॅपचा वापर करणे बंद करण्याचा विचार करत आहेत. तर 79 टक्के युजर्सने अद्याप याबद्दल विचार केलेला नाही की, व्हॉट्सअॅप सुरु ठेवावे की नाही. व्हॉट्सअॅप आपली प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू करणार होता. पण सध्या काही महिन्यांसाठी त्याला स्थगिती दिली गेली आहे.(WhatsApp अकाऊंट कम्प्यूटरला लिंक करण्यासाठी Fingerprint आणि Face ID नवं फिचर सादर)
दुसऱ्या बाजूला युजर्सला मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे कंपनीला हा निर्णय मे 2021 पर्यंत टाळावा लागला आहे. कंपनीला असे वाटते की, या दरम्यान व्हॉट्सअॅपची नवी प्रायव्हेसी पॉलिसी नीट वाचून आणि समजून घ्यावी. नवी पॉलिसी लागू करण्याची तारीख पुढे वाढवण्याच्या निर्णयाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. असे न झाल्यास व्हॉट्सअॅपवरील अॅक्टिव्ह युजर्सच्या संख्येत जबरदस्त घट होऊ शकते.
व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे विविध प्रश्न उपस्थितीत होत आहेत. 49 टक्के युजर्सने नाराजी दर्शवली असून 45 टक्के युजर्स व्हॉट्सअॅपवर कधीच भरोसा ठेवणार नाही असे बोलत आहेत. हे अॅप वापरणाऱ्या 35 टक्के युजर्सला याला ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजेच भरोसा तोडला गेल्याचे म्हटले आहे.(WhatsApp वर एखाद्याने तुम्हाला ब्लॉक केलय? 'या' पद्धतीने पाठवा मेसेज)
सायबर मीडिया रिसर्च मध्ये असे म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मॅसेंजर वरील बहुतांश युजर्स थर्ड पार्टी सर्वरवर स्टोर करण्यात येणारे चॅट्स बद्दल चिंतेत असतात. रिचर्स फर्म नुसार. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मॅसेंजरच्या 50 टक्क्यांहून अधिक युजर्सला दररोज स्पॅम्प मेसेज मिळतात. रिपोर्ट मध्ये पुढे असे सांगितले गेले आहे की, सर्वे मध्ये सामील झालेले 50 टक्के युजर्स असे होते की, ज्यांना अज्ञात क्रमांकावरुन संबंधित मेसेजेच मिळाले आहेत. ज्यामध्ये फिशिंग अटॅक आणि वायरस असणाऱ्या लिंक होत्या.
फिशिंग अटॅकसाठी व्हॉट्सअॅप हा हॅकर्ससाठी महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे. सर्वेच्या मते, व्हॉट्सअॅपवर फिशिंग अटॅक होण्याची शक्यता 52 टक्के आहे. तर टेलिग्रामसाठी ती 28 टक्के आहे. रिपोर्ट मध्ये असे ही म्हटले आहे की, सर्वेत सहभागी झालेले 41 टक्के युजर्स टेलिग्राम आणि 35 टक्के युजर्स सिग्नलवर वळण्याचा विचार करत आहेत.