Vivo V15 Pro | (Photo Credit: Vivo / Image Only Representative)

स्मार्टफोन विश्वातील बित्तंबातमी ठेवणाऱ्या स्मार्ट चाहत्यांसाठी आणि नावा स्मार्टफोन खरेदी करु इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोन बनवणारी चिनी कंपनी वीवो (Vivo) भारतीय ग्राहकांच्या भेटीला आणकी Vivo V15 Pro हा नवा स्मार्टफोन घेऊन येत आहे. साधारण पुढच्या आठवड्यात हा फोन भारतात लॉन्च होईल. BGR ने दिलेल्या वृत्तानुसार वीवो 8GB Variants लॉन्च करत आहे. या Variants मध्ये 128GB ऑनबोर्ड स्टोरेज दिले जाणार आहे. 8GB Variants ची किंमत 32,000 रुपये तर, 6GB Variantsची किंमत 28,990 रुपये इतकी असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

Vivo V15 Pro स्पेसिफिकेशन्स

रेजॉलूशन - 1080X2316 पिक्सल, सोबत

डिस्ल्पे - 6.39 इंच फुल एचडी+ AMOLED विथ गोरिल्ला ग्लास प्रटेक्शन

इतर फिचर्स

पॉप-अप सेल्फी कॅमेरा

स्क्रिनला नॉच किंवा डिस्प्ले होल नाही

फोन डिस्प्ले फिंगरप्रिंट

इतर वीवो फोनच्या तुलनेत अधिक कार्यक्षमता

फोनबद्धल अधिक सांगायचे तर, फोनच्या ग्रेडियंट डिझाईन बॅक पॅनलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 मेगापिक्सल, क्वाड पिक्सल सेन्सर सबतच एक 8 मेगापिक्सल आणि एक 5 मेगापिक्सल सेन्सरचाही समावेश आहे. फ्रंट कॅमेऱ्याबाबत बोलायचे तर, सेल्फी शौकीनांसाठी 32 मेगापिक्सल पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. सांगितले जात आहे की, हा जगातील पहिला 32 मेगापिक्सल पॉप-अप सेल्फी कॅमेरा फोन आहे. फोनचे सर्व कॅमेरे आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI)पॉवर्ड आहेत. ते बोके मोड, सुपर नाईट मोड आणि फेस ब्युटी फीचर सोबत येतात. (हेही वाचा, लेनोवो कंपनीने लॉन्च केले Lenovo Ego स्मार्टवॉच, किंमत फक्त 2 हजार रुपयांपेक्षा कमी)

6 जीबी रॅमवाला उपलब्ध असलेल्या वीवो 15 प्रो क्वालकॉम 675 प्रोसेसर सोबत येतो. मायक्रो एसडी कार्डच्या आधारे फोन मेमरी 256 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनच्या अपकमींग 8 जीबी रॅम वाले व्हेरीयंट मध्ये हा प्रोसेसर उपलब्ध असेन.