लेनोवो कंपनीने लॉन्च केले Lenovo Ego स्मार्टवॉच, किंमत फक्त 2 हजार रुपयांपेक्षा कमी
Lenovo Ego (Photo Credits-Twitter)

लेनोवो (Lenovo) कंपनीने भारतात एक नवीन फिटनेस स्मार्टवॉच नुकतेच लॉन्च केले आहे. या डिझिटल वॉचला कंपनीने Lenovo Ego असे नाव दिले असून त्याची किंमत फक्त 2 हजार रुपयांचा आतमध्ये आहे.

या स्मार्टवॉचच्या मदतीने तुम्हाला हार्ट रेट, ट्रॅकिंग, स्टेट ट्रॅकिंग, स्लिप मॉनिटरिंग आणि अन्य एक्टिविटी ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र कंपनीकडून असा दावा करण्यात आला आहे की हे स्मार्टवॉच हे एकदा चार्च केल्यास 20 दिवसापर्यंत त्याचे चार्जिंग राहू शकते असे म्हटले आहे. त्याचसोबत युजर्सला कॉल,मेसेज, इमेल आणि सोशल मीडियावरील विविध अॅपचे नोटिफिकेशनची सेवा मिळणार आहे. तर 50 मीटर पाण्याच्या खोलीपर्यंत जरी गेल्यास तरीही सुरु राहू शकते.(मुंबई: अवघ्या 9 वर्षांच्या मुलाची कौतुकास्पद कामगिरी; बनवले Health App)

लेनोवो ईगो हे स्मार्टवॉच तुम्ही 1,999 रुपयांना फ्लिपकार्ट आणि क्रोम रिटेल येथून खरेदी करु शकता. फ्लिपकार्टच्या ग्राहकांना या स्मार्टवॉचवर 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे. तसेच आयओएस आणि अँन्ड्रॉईड स्मार्टफोनसाठी तुम्ही हे वॉच वापरु शकणार आहात. परंतु युजर्सला मोबाईलमध्ये लेनोवो लाइफ अ्रॅप डाऊनलोड करावा लागणार आहे