Vivo S1 Pro जानेवारी 2020 मध्ये लाँच होणार; पाहा काय असतील या स्मार्टफोनची ठळक वैशिष्ट्ये
Vivo S1 Pro (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला Vivo S1 Pro हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. Vivo S1 Pro हा स्मार्टफोन जानेवारी 2020 मध्ये भारतात लाँच होणार आहे. याआधी हा स्मार्टफोन चीन आणि फिलिपियन्समध्ये लाँच झाला होता. या स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट डिस्प्ले, प्रोसेसर आणि अँड्रॉईड 9.0 पायचा सपोर्ट मिळणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये 6.38 इंचाची फुल एचडी प्लस सुपर अमोल्ड डिस्प्ले, वॉटरड्रॉप नॉच मिळणार आहे. जबरदस्त परफॉर्मन्ससाठी यात ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर सह 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट मिळणार आहे. हा फोन अँड्रॉयड 9.0 पाय आणि फनटच ओएस 9.2 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ग्राहकांसाठी व्होडाफोन लॉन्च करणार सर्वात स्वस्त प्लॅन; केवळ 39 रुपयांपासून होणार सुरुवात

सध्याच्या काळात सेल्फीचे फॅड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे आपल्या डिवाईसमध्ये सेल्फी काढण्यासाठी कॅमे-याचा उत्तम दर्जा असावा यासाठी सर्व कंपन्या प्रयत्नात असतात. Vivo S1 Pro मध्येही सेल्फीसाठी जबरदस्त फिचर्स असलेला कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये मागे क्वॉड कॅमे-याचा सेटअप दिला आहे. तर 48MP चा GM1 सेंसर, 8MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2MP चा डेप्थ लेन्स आणि 2MP चा मायक्रो लेन्स देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 4500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंग करण्यासाठी 18 व्होल्टची फास्ट चार्जिंगचा सपोर्टही देण्यात आला आहे.

नव्या वर्षाला लवकरच सुरुवात होणार आहे. यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन कंपनीकडून आकर्षित अशी सूट देण्यात येत आहे. चीनी कंपनी एमआयएमने त्यांच्या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट दिली होती. मात्र, विवो कंपनीने यावर्षी हा विडा उचलला असून त्यांनी व्ही 17 (Vivo V17), व्ही 17 प्रो (Vivo V17), विवो व्ही 15 प्रो (Vivo V15), विवो एस 1 (Vivo S), आणि विवो वाय 19 (Vivo V19) या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट दिली आहे