ग्राहकांसाठी व्होडाफोन लॉन्च करणार सर्वात स्वस्त प्लॅन; केवळ 39 रुपयांपासून होणार सुरुवात
वोडाफोन

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपनींकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. यातच व्होडाफोन (Vodafone) कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी (prepaid customers) स्वस्त आणि धमाकेदार प्लॅन आणण्याची योजना आखली आहे. तसेच लवकरच व्होडाफोन कंपनीच्या ग्राहकांना या प्लॅनचा आनंद घेता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, या प्लॅनची सुरुवात केवळ 39 रुपयांपासून होणार आहे. या व्यतिरिक्त 119 रुपये, 129 रुपये, 269 रुपयांचे इतर प्लॅन आहेत. सध्या वरील प्लॅन हे केवळ मुंबई, आंध्र प्रदेश ओडिशा आणि उत्तर प्रदेश मधील व्होडाफोनच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. लवकरच हे प्लॅन संपूर्ण भारतात लागू होतील. हे देखील वाचा- Year Ender 2019: या वर्षात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले Top 5 'Dating Apps'

129 रुपयांचा प्लॅन

129 रुपयांच्या प्लॅनमध्ये व्होडाफोन 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएस याच्यासह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात येणार आहे. या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे. हा प्लॅन 149 रुपयांच्या प्लॅन प्रमाणेच आहे. मात्र 149 रु. च्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.

119 रुपयांचा प्लॅन

119 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 जीबी डेटा दररोज मिळणार आहे. तसेच प्रतिदिन 100 एसएमएस आणि अनलिमिटेड वॉइस कॉलिंग मिळणार आहे. या प्लानची वैधता 21 दिवसांची आहे. या प्लानच्या सुविधा पाहता तो 219 रुपयांच्या प्लानसारखाच आहे, मात्र याची वैधता 219 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 7 दिवस कमी आहे.

269 रुपयांचा प्लॅन

यात सर्वात मोठा 269 रुपयांचा प्लॅन त्या व्होडाफोन युजर्ससाठी आहे, ज्यांना जास्त दिवसांची वैधता हवी आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 600 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगसह 4 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे.

39 रुपयांचा प्लॅन

वोडाफोनचा 39 रुपयांचा ऑलराउंडर प्लान आला आहे. हा ठराविक ग्राहकांपुरताच मर्यादित आहे. यात फुल टॉक टाइमसह 100 एमबी डेटा मिळणार आहे. या प्लानची वैधता 28 दिवसांची असणार आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक टेलिकॉम कंपनीकडून वेगवेगळे प्लॅन आणले जातात. महत्वाचे म्हणजे, जेव्हापासून रिलायन्स जिओ बाजारात दाखल झाली आहे, तेव्हापासून अनेक कंपनीला टाळे लागले आहेत. यातच आपल्या ग्राहकांना खुष करण्यासाठी व्होडाफोन कंपनी नवा प्लॅन लॉन्च करणार आहे.